223

ओशोधरा मैत्री संघाच्या ध्यान केंद्राचे उद्घाटन संपन्न

# ध्यानधारणा केल्याने चित्त निर्मल होते – स्वामी दिवाकर पाटणे

वाडी(प्र): ओशो धारा मैत्री संघ विदर्भाच्या वतीने रविवारी महाल तुळशीबाग येथील संत नरहरी आश्रम माळवी सुवर्णकार संस्थेच्या सभागृहात विदर्भाचे संयोजक स्वामी दिवाकर पाटणे यांच्या हस्ते ध्यान केंद्राचे विधीवत उद्घाटन करण्यात आले.येथे दर रविवारी सकाळी ९ ते ११ या वेळेत मोफत ध्यान धारणा होणार आहे. यावेळी उपस्थित भक्तांना संबोधित करताना स्वामी दिवाकर पाटणे यांनी सांगितले की नियमित ध्यानधारणा केल्याने मनुष्याचे चित्र निर्मल होऊन मन प्रसन्न होण्याचे सांगितले.

कार्यक्रमाला आचार्य डॉ.हरदर्शन,आचार्य ज्योती बागडे, आचार्य अमोल,आचार्य महेंद्र नागपाल आणि साधक उपस्थित होते. आचार्य हरिदर्शन जी यांनी सुप्रभात ध्यान करून केंद्राची सुरुवात केली.