डॉ. आंबेडकर जयंती निमित्त नियोजन सभा संपन्न

259

डॉ. आंबेडकर जयंती निमित्त नियोजन सभा संपन्न

# उत्सव समितीची नव्याने कार्यकारिणी घोषित

वाडी(प्र): प.पूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती उत्साहात संपन्न करण्याकरिता वाडी स्थित अमरावती महामार्गावरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा प्रांगणात बुधवारी जयंती उत्सव समितीच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले.

यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती संपन्न करताना अमरावती महामार्गावर सुरू असलेले उड्डाण पुल व रस्त्याचे बांधकाम बघता वाहतुकीला अडथळा होणार नाही अशा पद्धतीने रॅलीचे नियोजन करणे, महिला मुली व लहान बालकां कडे विशेष लक्ष देणे, याकरिता पोलीस विभागाचे विशेष सहकार्य घेणे. इं.बाबी ठरविण्यात आल्या. यासह संपूर्ण वाडी परिसर निळे झेंडे व पताकांनी सजविण्या सह रॅलीचे स्वरूप भव्य-दिव्य असावे याकरिता मोठ्या संख्येने आंबेडकरी अनुयायी सहभागी होतील याची उपस्थितांनी जबाबदारी घेण्याचे आवाहनही या ठिकाणी करण्यात आले.

133 वी जयंती संपन्न करण्याकरता समितीची नव्याने कार्यकारणी घोषित करण्यात आली.यावेळी सर्वानुमते सामाजिक कार्यकर्ते संतोष नरवाडे अध्यक्ष तर गौतम तिरपुडे यांना सचिव, कोषाध्यक्ष माजी जि.प.सदस्य दिनेश बन्सोड यांच्यावर धुरा सोपविण्यात आली. उपाध्यक्ष दिनेश कोचे तर सहसचिव बाबुराव वासनिक यांची नियुक्ती करण्यात आली. इतर सर्व उपस्थितांना समितीचे सभासद बनविण्यात आले.

बैठकीला वरिष्ठ सामाजिक कार्यकर्ते दिनेश बन्सोड,संतोष नरवाडे,गौतम तिरपुडे,दिनेश कोचे,प्रमोद भोवरे, दिलीप मेंढे,भीमरावजी कांबळे,अशोक गडलिंगे,बाबुराव वासनिक,राजु भोवते,दिलीप भोरगडे,नंदू सोमकुवर,राजेश जंगले,नितेश जंगले,सोनू पाटील,बबलू गजभिये,भोजराज नंदागवळी,किशोर नागपूरकर,देवा राऊत,बबलू मेश्राम,साहिल खोब्रागडे, अजय सोनटक्के,चंदू सोनपिंपळे, बबलू वासनिक, आशिष गौरखेडे,नागसेन शेंडे,राहुल मेश्राम,जितेंद्र बागडे, किशोर मेश्राम इत्यादी सह परिसरातील मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते.