भारतीय बौद्ध महासभेचा वर्धापन दिन संपन्न

256

भारतीय बौद्ध महासभेचा वर्धापन दिन संपन्न

वाडी(प्र): दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्धमहासभेचा ७० वा वर्धापण दिन जिल्हा ग्रामीणच्या वतीने शुभद्रांगी बुद्ध विहार महादेव नगर वाडी येथे संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागपूर ग्रामीण महिला विंगच्या अध्यक्षा कुंदा धोंगडे होत्या. प्रमुख अतिथी नागपूर ग्रामीचे अध्यक्ष सुरेश उके, उपाध्यक्ष चन्द्रशेखर गणवीर, प्रवक्ते डी.डी. गजभिये, जयप्रकाश धोंगडे, वैशाली नितनवरे, अर्चना मेश्राम उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला अतिथिंनी भगवान बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन केले.
यावेळी उपस्थित अतिथींनी बौद्धांचे राष्ट्रीय स्तरावर अस्तित्व निर्माण करण्यासाठी सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक व्यवस्थे सह उद्योग धंदे प्रस्थापित करण्या करिता नियोजनबद्ध कृती कार्यक्रम राबवून भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजरत्न आंबेडकर यांना सहकार्य करावे असे आवाहन केले.
कार्यक्रमाला प्रामुख्याने रंजीत राऊत, योगेंद्र भालाधरे, अशोक बागडे, किरण राऊत, पुष्पा उके, रेखा मून उपस्थित होते.संचालन सपना डेकाटे यांनी केले
कार्यक्रम यशस्वीतेकरिता पूजा बोदिले, शुभांगी वैरागडे, प्रिया चौधरी, गीता रोडगे, श्रध्दा मेश्राम, गुणवंत तभाने, बाली मानवटकर, सुनीता मेश्राम आदींनी परिश्रम घेतले. यावेळी मोठ्या संखेने बौद्ध अनुयायी उपस्थित होते.