वाडीत बौद्ध पौर्णिमेला भव्य धम्म मोमबत्ती शांती रॅली 

213

वाडीत बौद्ध पौर्णिमेला भव्य धम्म मोमबत्ती शांती रॅली 

वाडी(प्र): सामाजिक,धार्मिक सांस्कृतिक संस्था अस्मिता मंचच्या वतीने तथागत भगवान बुद्ध यांची २५८६ जयंती व वैशाख पौर्णिमेचे औचित्य साधून भव्य धम्म मोमबत्ती शांती रॅलीचे आयोजन २३ मे रोजी सायंकाळी ५.३० वाजता करण्यात आले आहे.

रॅली ची सुरुवात स्मुर्ती ले-आउट दत्तवाडी येथील मैदानातून होऊन संपूर्ण वाडी परिसरातून भ्रमण करीत धम्मकिर्ती नगरच्या महाप्रज्ञा बुद्ध विहारात रॅलीचे समापन करण्यात येईल.

यात परिसरातील सर्व महिला मंडळ,युवा मंडळ,वाडी दुकानदार संघ,समता सैनिक दल,भीमसेना शाखा, दत्तवाडी दुकानदार संघटना,जयंती उत्सव समिती,

सहकारी संस्था, उपासक-उपासिका सहभागी होणार आहेत. बुद्धम् शरणम् गच्छामि या जयघोषासह शिस्तबद्ध पद्धतीने ही शांती रॅली निघणार आहे. जास्तीत जास्त उपासक उपासिकांनी पांढऱ्या शुभ्र वस्त्र परिधान करून सहभागी होण्याचे आवाहन

अस्मिता मंचाचे राजकुमार बोरकर,शुद्धोधन शेंडे, नरेश चोखांद्रे,मोहन लोखंडे,दादाराव कापसे,सुरेश रामटेके,एड.अनिल गायकवाड,वामन गनेर,अशोक घरडे,वसंता शेंडे,डाॅ.मनोज भांगे,नारायण मालके, मनोहर तभाने, ॲड.चंद्रशेखर चांदुरकर,प्रशांत साखरे,अशोक कांबळे,कपिल सोनाळे इत्यादींनी केले आहे.