वाडीत विविध पक्ष-संघटनां तर्फे शिवरायांना अभिवादन 

245

वाडीत विविध पक्ष-संघटनां तर्फे जयंतीदिनी शिवरायांना अभिवादन 

# वंचित बहुजन आघाडीचे रक्तदानातून अभिवादन 

वाडी(प्र): रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९४ व्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडीच्या वतीने खडगाव मार्ग स्थित शिवाजी स्मारक येथे छत्रपती शिवरायांच्या सिंहासनारुढ पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.दरम्यान जोरदार घोषणाबाजी करून शिवरायांचा जयजयकार करण्यात आला.यावेळी अमन ब्लड सेंटर नागपूरच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात जितू सोनुले या कार्यकर्त्यांने शिवरायांना अभिवादन म्हणून रक्तदान केले.अभिवादन कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विलास वाटकर,माजी जि.प.सदस्य दिनेश बन्सोड,माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे जिल्हाध्यक्ष विवेक वानखेडे,जिल्हा उपाध्यक्ष अतुल शेंडे, ईश्वर उके,माजी नगरसेवक प्रमोद भोवरे,सह अनिल पुंड,सुरज भलावी,बाबुराव वासनिक,राजु भोवते,जीतु सोनुले,प्रकाश रामटेके, नाना मेश्राम,प्रवीण तायडे,दिलीप भोरगडे,नितीन वाघमोडे, नितीन तायडे,भैयाजी भोंगाडे,भाऊराव उके इत्यादी उपस्थित होते.

# भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा निमित्त आदर्श नगर येथिल महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण करुन कांग्रेसतर्फ़े अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी युवक कांग्रेसचे राज्य सचिव अश्विन बैस, जिल्हा महासचिव दुर्योधन ढोणे,शहर अध्यक्ष शैलेश थोराने, महिला अध्यक्ष अरुणा पगाडे, योगेश कुमकुमवार, पंकज फलके,अमोल केदार,भीमराव कांबळे,किशोर नागपुरकर,अशोक गडलींगे,चंद्रशेखर ईखनकर,नीतेश क्षीरसागर,रूपाली जीवनकर,फूलनबाई पटले,नीता मडावी,मीनाक्षी पाटिल सह कार्यकते उपस्थित होते.

# बहुजन समाज पार्टी

छ.शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त खडगाव रोडवरील शिवस्मारक येथे अभिवादन करण्यात आले.या प्रसंगी वाडी झोन प्रमुख सुधाकर सोनपिंपळे,शहर अध्यक्ष सुभाष सुखदेवे, महासचिव मनिष रामटेके युवराज भांगे,मधुकर शेंडे, कैलास गणवीर, विरेंद्र कापसे, प्रविण मेश्राम, राष्ट्रपाल वाघमारे, किशोर इंगळे,अश्वीन नारनवरे, राहुल वासनीक,तिर्थराज सुर्यवंशी,गौतम भास्कर आयुष खंडारे इं.कार्यकर्ता उपस्थित होते.

# श्री संताजी अखिल तेली समाज संघटन

श्री संताजी अखिल तेली समाज संघटन महाराष्ट्र राज्य वाडी शाखे द्वारे छ.शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त खडगांव रोड वाडी येथे संघटनेचे संस्थापक अनिल बजाईत,सचिव चेतन वरटकर, शहराध्यक्ष अनिल पुंड, सुरेश बारई यांच्या हस्ते पुतळ्यास माल्यार्पन तथा पुष्पगुच्छ अर्पन करण्यात आले.कार्यक्रमाला मनोज भुरे, हरपालप्रसाद साहु,उमेश साहु,अनिल दहाघाणे, पुरूषोत्तम लिचडे,मनोज भिवगडे,मंगेश बरडे,मनोज रागीट,नितीन फटींग,शरद साखरकर,संदीप ईखनकर,मंगेश माहुरे,नानाजी पारधी,सचिन लिचडे,ई.उपस्थित होते.

# भाजपा वाडी मंडळ

वाडी मंडळ व वाडी शहर तर्फे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजाधिराज रयतेचे राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त भाजपा वाडी मंडळ च्या वतीने प्रतीमेला पुष्पहार अर्पण करुन राजेंना मानाचा मुजरा करण्यात आला.जय भवानी जय शिवाजी चे नारे देण्यात आले.याप्रसंगी हिंगणा विधानसभा निवडणुक प्रमुख नरेश चरडे,मंडळ अध्यक्ष आनंदबाबु कदम, वाडी शहर अध्यक्ष कैलाश मंथापुरवार, प्रकाश डवरे,राजुताई भोले, सुजीत नितनवरे, दिनेश कोचे, बिमलेश सिंह, रामअवलंब यादव,अक्षय तिडके, कमल कनोजे, ईशांत राऊत, रामप्रसाद पटले, लक्ष्मीनारायण केसरवानी, दत्ता बाबर, प्रशांत श्रीवास्तव, भीमराव मोटघरे, विनोद चाफेकर, नाना गावंडे, ऊमेश शाहु,रोहित तिवारी, राहुल तायडे, विशाल डोंगरे, आकाश पवार, नितिन फटींग,अजय यादव, नामदेव चवरे,नाना पारधी, लीलाधर भोयर, मंगेश खोरगडे,महेश रागीट, ज्योती भोरकर, कल्पना सगदेव, ज्योत्सना नितनवरे,मंगला पडोळे, रंजीता यादव,लक्ष्मी बैस, संध्या डवरे, वर्षा शिंगरू, नंदा कदम, रंजीता सिंग, प्रमिला तिवारी, आनंद यादव, सुधीर सिंह राना, अमरेंद्र सिंह,रामनाथ ठाकुर, शशिकांत तिवारी, पिंटू पटले,आषिष रामटेके, सुरेश बारई,शुभम पिसे, प्रकाश मोगरकर, अजय पांडे, नामदेव चवरे,प्रणय घाटोळे,ऊज्वल चांडक ई.पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.

# टेकडी वाडी महिला मंडळ

टेकडी वाडी महिला मंडळाच्या च्या वतीने शिवरायांना जयंतीदिनी अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी सुनिता बोरकर,श्वेता चव्हाण,लतिका लोणारे,उर्मिला भदाडे वनिता मानकर,मनीषा कुंभलकर,प्रियंका तायडे, मेघा पाटील,पुष्पा चव्हाण, बेबी रेवतकर गीता उके,अंशिका तायडे इत्यादी उपस्थित होते.