“स्नेहसंमेलन” शालेय जीवनातील अविस्मरणीय क्षण – गजानन तलमले

209

“स्नेहसंमेलन” शालेय जीवनातील अविस्मरणीय क्षण – गजानन तलमले

# इंदिरा गांधी लोअर इंग्रजी शाळेत स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न 

वाडी(प्र): दत्तवाडी येथील जनकल्याण बहुउद्देशीय शिक्षण संस्था द्वारा संचालित इंदिरा गांधी लोअर इंग्रजी शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन न.प.वाडीच्या क्रिडा मैदानावर मोठया उत्साहात संपन्न झाले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला सामाजिक कार्यकर्ते माजी उपसरपंच आनंदबाबू कदम यांच्या अध्यक्षतेखाली माजी बालकल्याण सभापती कल्पना सगदेव,संस्थेचे अध्यक्ष गजानन तलमले,सचिव विजया तलमले,मुख्याध्यापिका पुष्पा क्षीरसागर,वाडी पत्रकार संघाचे कोषाध्यक्ष दिलीप तराळेकर,सहसचिव नरेशकुमार चव्हाण,शिक्षण संस्थेच्या कोषाध्यक्षा लता सुर्यवंशी,सदस्य राजकुमार पराची,ज्ञानेश्वर बुधे यांच्या हस्ते दिप प्रज्वलित करून स्नेहसंमेलनाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात भारतीय परंपरा व संस्कृतीची जोपासना करीत दिवसभर रांगोळी,चित्रकला व क्रिडा स्पर्धा अशा विविधांगी उपक्रमात सहभागी झाले तर सायंकाळच्या संपन्न स्नेह संम्मेलनात मराठी लावणी,सांस्कृतिक नृत्य,एकपात्री-द्वि-पात्री नाटके,विविध नृत्य सादर करून विद्यार्थ्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली.यावेळी राज्य शासनाची राजपत्रीत कृषी अधिकारी परीक्षा उत्तीर्ण झालेले आदित्य गजानन तलमले या विद्यार्थ्याचे मान्यवरांच्या हस्ते पुष्प बुके देऊन अभिनंदन करण्यात आले. उपस्थितांना संबोधित करताना शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गजानन तलमले यांनी स्नेहसंमेलन हे विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील अविस्मरणीय क्षण असल्याचे सांगून या आठवणींची शिदोरी आयुष्यभर जतन करण्याचा सल्ला दिला.

संचालन जेष्ठ शिक्षिका आशा गीरडकर यांनी तर आभार सुनिता तुरणकर यांनी मानले.कार्यक्रमाचा समारोप वंदे मातरम या गीताने करण्यात आला.यशस्वीतेसाठी शिक्षक प्रशांत तलमले,नितेश कोरे,राजू तिनखेडे,आशा गीरडकर,नेहा इटनकर,ज्योती रामटेके,नितू खोब्रागडे,संगीता होले,विद्या हारोडे ,सुनंदा ठाकरे , सुनंदा जोगे इं.नी अथक परिश्रम घेतले. स्नेहसंमेलनाला मोठया संख्येने विद्यार्थी,पालक व नागरिक उपस्थित होते.