वाडीत शौर्य दिनानिमित्त भीमसेनेची विजयी रॅली

177

वाडीत शौर्य दिनानिमित्त भीमसेनेची विजयी रॅली

# डॉ.आंबेडकर नगरच्या विविध चौकात भ्रमण करून विजयोत्सव साजरा

 

वाडी(प्र): भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त शूरवीरांना मानवंदना देण्यासाठी वाडी येथे अभिवादन रॅली काढून विजयोत्सव साजरा करण्यात आला.

भीमसेनेचे जिल्हाध्यक्ष रोशन सोमकुवर यांच्या पुढाकाराने आयोजित या रॅलीची सुरवात वाडी अमरावती महामार्ग स्थित डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा प्रांगणातून करण्यात आली.यावेळी मान्यवरांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर,तथागत गौतम बुद्ध,सम्राट अशोक यांच्या पुतळ्याला माल्यर्पण करून अभिवादन केले व सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली. तदनंतर उपस्थित मान्यवरांनी रॅलीला निळा झेंडा दाखवून प्रस्थान केले. यावेळी फटाक्याची आतिश बाजी करून विजयोत्सव साजरा केला.या विजयी रॅलीत माजी जि.प.सदस्य दिनेश बन्सोड,नागपूर तालुका ग्रामीण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश कोकाटे, माजी नगरसेवक दिनेश कोचे, बसपा वाडी शहराध्यक्ष गौतम मेश्राम,सामाजिक कार्यकर्ते गौतम तिरपुडे,भीमरावजी कांबळे इत्यादींनी सहभागी होऊन शुभेच्छा दिल्या.

तद्नंतर ही अभिवादन रॅली डॉ.आंबेडकर नगरच्या विविध चौकात ढोल ताशाच्या गजरात वाजत-गाजत भ्रमण करीत व बुद्ध विहाराला भेटी देत पुन्हा अमरावती महामार्गाने डॉ.आंबेडकर पुतळा प्रांगणात पोहचली. येथे रॅलीचे समापन करण्यात आले.

रॅलीच्या यशस्वीतेकरिता सुरज वानखेडे,चंदू सोनपिंपळे, शुद्धोधन सोनवणे,सारीपुत्र वानखेडे, निखिल भरतवाडे, सिद्धार्थ खोब्रागडे,रितेश सोमकुवर, निशांत लोणारे,आनंद वानखडे, सोनू मेश्राम,वासू सरोदे,देवचंद् नाइक,अमित रंगारी, राकेश रामटेके. अवि राउत. भोजराज नंदागवळी,राजेश खोब्रागड़े,अंकुश रामटेके,दिपाली मेश्राम,संगीता नंदागवळी,बबीता सोमकुवर मनीषाताई राऊत,बेबी वानखेड़े. कमला ताई भरतवाडे. माया बाई कांबळे. सशिकाला थोरात. ममता मडके,रेखाताई नाईक, पुष्पा लोणारे इत्यादींनी अथक परिश्रम घेतले.