न्यू स्टार पब्लिक स्कूल मध्ये पाककला उत्सव

285

न्यू स्टार पब्लिक स्कूल मध्ये पाककला उत्सव

# विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

वाडी(प्र): वाडी नजीक सोनबा नगर स्थित उज्वल बहुउद्देशीय शिक्षण संस्थे द्वारा संचालित न्यू स्टार पब्लिक स्कूल मध्ये नुकतेच विद्यार्थ्यांसाठी पाककला  उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी शाळेच्या पटांगणात विद्यार्थ्यांनी स्वतः हाताने तयार केलेल्या वेगवेगळ्या खाद्य व्यंजनाचे स्टॉल आकर्षक पद्धतीने सजवले होते. या नावीन्यपूर्ण व्यंजनाचा स्वाद घेण्यासाठी पालकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या पाककला उत्सवातून विद्यार्थ्यांना व्यावसायिक ज्ञान मिळून आर्थिक मेळ कसा बसवायचा ? याचे शिक्षण मिळाल्याचे मुख्याध्यापिका संगीता धानोरकर यांनी सांगितले.तर या पाककला उत्सवात विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षण संस्थेचे सचिव प्रकाश कोकाटे,मुख्याध्यापिका संगीता धानोरकर,आयोजक स्वप्नील कोकाटे,सामाजिक कार्यकर्ते विपिन डोंगरे, अनुप रामटेके प्रामुख्याने उपस्थित होते.

उत्सवाच्या आयोजनाकरिता शिक्षिका माधुरी ठाकरे,शिल्पा भार्गव,शिल्पा लोखंडे,विद्या पटले,मेघा माने,नेहा डोंगरे,विनया शुक्ला, प्रणाली साखरकर,अंजली चट्टे, सारिका उके,पूनम लुंगे,शिक्षकेतर कर्मचारी वनिता लक्षणे,रेखा मेश्राम यांनी अथक परिश्रम घेतले.

उत्सवात पालकांसह नागरिकांचीही मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.