प्रतापनगर विद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन संपन्न

536

प्रतापनगर विद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन संपन्न

# विद्यार्थ्यांनी ‘प्रतिज्ञेचे’ केले सामूहिक वाचन

नागपूर(ता.२५): प्रतापनगर शिक्षण संस्थेद्वारा संचालित प्रतापनगर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात १४ व्या राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी प्रतिज्ञेचे सामूहिक वाचन केले. शाळेच्या पटांगणात संपन्न झालेल्या या प्रतिज्ञा वाचनात माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी एकत्रित आले.यावेळी शासनातर्फे देण्यात आलेल्या प्रतिज्ञेचे कु. गितीका डुले हिने आधी वाचन केले व तिच्या पाठोपाठ सर्व विद्यार्थ्यांनी सामुहिकरित्या सदर प्रतिज्ञा ग्रहण केली.यावेळी ज्येष्ठ शिक्षिका सुनंदा गौरकर यांनी या राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य विद्यार्थ्यांना पटवून देताना सांगितले की,आपल्या देशाच्या लोकशाही परंपरेचे जतन करण्यासाठी मुक्त, निष्पक्षपाती व शांततापूर्ण वातावरणात निवडणुकीचे पावित्र्य राखणे व निवडणुकीत जात,धर्म,पंथ,भाषा इत्यादीच्या प्रभावाखाली न येता निर्भयपणे मतदान करणे हे प्रत्येक भारतीय मतदारांचे कर्तव्य असल्याचे सांगून विद्यार्थ्यांत याबाबत जनजागृती केली.

कार्यक्रमाचे यशस्वीतेकरिता शिक्षिका वंदना काळे,विजय वानखेडे इत्यादींनी सहयोग दिला. प्रतिज्ञा वाचनात मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.