वंचित बहुजन आघाडीच्या वतीने श्री संताजी जगनाडे महाराज जयंती संपन्न ! 

323

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने श्री संताजी जगनाडे महाराज जयंती उत्साहात संपन्न ! 

# महाराष्ट्र ही संतांची भूमी,संविधानामुळे समाजाची प्रगती – अनिल बजाईत 

वाडी (प्र.) : मानवतेची शिकवण देणारे थोर संत श्री संताजी जगनाडे महाराज यांची जयंती वंचित बहुजन आघाडीच्या वतीने वाडी स्थित अमरावती महामार्गावरील पक्षाच्या कार्यालयात माजी जि.प.सदस्य दिनेश बन्सोड यांच्या पुढाकाराने उत्साहात संपन्न करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कामगार नेते अनिल बजाईत,तेली समाज संघटनेचे वाडी शहराध्यक्ष अनिल पुंड, सचिव चेतन बरबटकर,नागपूर जिल्हाध्यक्ष अनिल डहागणे यांनी संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. तदनंतर या प्रमुख अतिथींचे कार्यक्रमाचे आयोजक दिनेश बन्सोड यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

आपले मनोगतात प्रमुख अतिथी अनिल बजाईत यांनी महाराष्ट्र ही संतांची भूमी असून समाज संताचे विचार व संविधानाच्या शिकवणीमुळे प्रगती करीत असल्याचे सांगितले. यावेळी अनिल पुंड यांनीही समायोजित मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष अतुल शेंडे, ईश्वर उके,सामाजिक कार्यकर्ते, गजानन तलमले, बाबुरावजी वासनिक,दिलीप भोरगडे, सतीश जंगले,अनिल वानखडे,फिरोज खान पठाण, संजय भोरगडे,प्रकाश रामटेके, भारत ठवरे,प्रकाश वाटकर, सुधीर कांबळे,प्रवीण तायडे, नितीन वाघमोडे, रवी मेश्राम,चंदु सोनपिंपळे,जितेंद्र पानतावणे,मिलींद कांबळे इं.उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन विजय वानखेडे यांनी तर आभार दिलीप भोरगडे यांनी मानले.