वाडीत महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना अभिवादन

344

वाडीत महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना अनुयायांचे अभिवादन

# विविध पक्ष,संघटनांनी केले अभिवादन

वाडी(प्र) : भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त वाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा प्रांगणात विविध संस्था,संघटना व पक्षांनी माल्यार्पण व दीप प्रज्वलन करून भावपूर्ण आदरांजली वाहून अभिवादन केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने माजी जि.प.सदस्य दिनेश बन्सोड, शिवसेनेचे शहराध्यक्ष मधु मानके पाटील, राष्ट्रवादी सामाजिक न्याय आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष नरवाडे यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर,तथागत गौतम बुद्ध,सम्राट अशोक यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.तदनंतर माजी ग्रा.पं.सदस्य कंठीराम तागडे यांनी सर्वांना सामुहिक त्रिशरण पंचशील ग्रहण करविले. यावेळी दोन मिनिटे मौन धारण करून बाबासाहेबांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

तद्बानंतर “बाबासाहेब अमर रहे” च्या घोषणा देण्यात आल्या.या अभिवादन कार्यक्रमाला माजी जि.प.सदस्य दिनेश बन्सोड,शिवसेनेचे शहराध्यक्ष मधु मानके पाटील, समितीचे पदाधिकारी संतोष नरवाडे,माजी नगरसेवक प्रमोद भोवरे,दिनेश कोचे,सामाजिक कार्यकर्ते अनिल पुंड, ईश्वर उके,राजेश जंगले,गौतम तिरपुडे,किशोर नागपूरकर भिमरावजी कांबळे, पंडित भोरगडे,प्रकाश रामटेके, गजानन वासनिक,प्रवीण तायडे,रोशन बागडे,रवी मेश्राम, सचिन खोब्रागडे, गजानन बन्सोड, मिलिंद बागडे,बबलू गजभिये,विपीन टेंभुर्णे,ममता मडके,कांताबाई नगराळे इत्यादी उपस्थित होते.

# भारतीय बौद्ध महासभा च्या वतीने

सुरेश उके, चंद्रशेखर गणवीर,डी.डी.गजभिये,शैलेंद्र लामसोंगे,प्रकाश चोखांद्रे,योगेंद्र भालाधरे,शीलाताई रंगारी,प्रिती वाकडे, किरण राऊत,राजेश रंगारी इत्यादींनी अभिवादन केले.

# वाडी शहर बसपा च्या वतीने

सुधाकर सोनपिंपळे,सुरेश घरडे,बबलू मेश्राम यासह आशीर्वाद कापसे,चंद्रविलास लोणारे इत्यादींनी अभिवादन केले. यावेळी स्मारक परिसरात मोठ्या प्रमाणात अनुयायांची गर्दी होती.