तेजस विद्यालयात संस्कृत दिन उत्साहात संपन्न

42

तेजस विद्यालयात संस्कृत दिन उत्साहात संपन्न

वाडी(प्र): संस्कृत दिनाचे औचित्य साधून नुकतेच दाभा येथील तेजस विद्यालयात संस्कृत दिन विविध कार्यक्रमांतर्गत उत्साहात संपन्न झाला.कार्यक्रमाचे प्रास्ताविकात यशवंत खारपाटे यांनी संस्कृत मध्ये भाषेचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.तर वर्ग ४ ते ८ च्या विद्यार्थ्यांनी शैलजा पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध फळांची प्रदर्शनी लावून त्यांना संस्कृत मध्ये नावे दिली यासह मनोरंजनात्मक कार्यक्रमही संस्कृत मध्ये सादर केले.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी संस्कृत भारतीचे नागपूर महानगर मंत्री प्रा.संभाजी पाटील यांनी संस्कृत भाषा पुरातन काळापासून अस्तित्वात असून ती एकमेकांना जोडण्याचे काम करीत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाला संस्थेचे सचिव अरविंद टेंमूर्णीकर प्रामुख्याने उपस्थित होते.आभार शाळेच्या मुख्याध्यापिका मृदुला देशमुख यांनी केले.