प्रतापनगर प्राथमिक शाळेत जन्माष्टमी महोत्सव

49

प्रतापनगर प्राथमिक शाळेत जन्माष्टमी महोत्सव उत्साहात संपन्न

# बालगोपालांच्या वैविध्यपूर्ण वेशभूषेणे वेधले लक्ष

नागपूर(ता.13) :  प्रतापनगर शिक्षण संस्थेद्वारा संचालित प्रतापनगर प्राथमिक शाळेत जन्माष्टमीनिमित्त लहान बालकांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी शालेय परिसरात फुलांची सुंदर आरास करण्यात आली होती.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रतापनगर शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष शंकर पहाडे होते तर उद्घाटन प्रमुख पाहुणे सचिव अनुपमा नाफडे, सेवानिवृत्त ब्रिगेडियर सुनील गांवपांडे यांनी दीप प्रज्वलन करून केले. यावेळी मुख्याध्यापिका मंजुश्री टिल्लू, मुख्याध्यापक श्रावण सुरकार प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी बालक-बालिकांनी राधा कृष्णाची सुंदर वेशभूषा धारण केली होती. तदनंतर सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत या चिमुकल्यांनी श्रीकृष्णावर आधारित विविध बहारदार नृत्यांची प्रस्तुती केली.यावेळी दहीहंडी फोडून बालकांनी आनंदोत्सव साजरा केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष शंकर पहाडे यांनी बाल गोपालांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या.

तदनंतर गोपाळकाला वितरित करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता शिक्षिका वैदेही दिवाण,जयश्री पांडे,मोनाली मोहोड,नितु चव्हाण, सचिन भोंगाडे,आशाबाई दहीकर यांच्यासह अनेकांनी सहकार्य केले.संचालन सुप्रिया खोत तर आभार पवन नेटे यांनी मानले.कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.