वाडीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित भव्य रॅली

319

वाडीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित भव्य रॅली

# आकर्षक रथ सजावटीने नागरिकांचे वेधले लक्ष 

वाडी(प्र): डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त(Birth Anniversary of Dr.B.R.Ambedkar) वाडी आंबेडकर नगर अमरावती रोड स्थित पुतळा प्रांगणात सकाळी 11 वाजता क्षेत्राचे आमदार समीर मेघे, माजी मंत्री रमेशचंद्र बंग,माजी जि.प.सदस्य दिनेश बन्सोड, माजी नगराध्यक्ष प्रेम झाडे यांच्या हस्ते प.पू. डॉ.बाबासाहेब आंबेडकर,तथागत गौतम बुद्धांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले.पूज्य भंते संघकीर्ती महाथेरो यांनी झेंडावंदन केले व सामूहिक त्रिशरण पंचशील ग्रहण करविले. यावेळी माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांच्या हस्ते केक कापण्यात आला. मंचकावर माजी आ. प्रकाश गजभिये,माजी जि.प.सदस्य दिनेश बन्सोड,माजी नगराध्यक्ष प्रेम झाडे,वाडी न.प.चे मुख्याधिकारी डॉ.विजय देशमुख,माजी उपनगराध्यक्ष राजेश थोराणे,नरेश चरडे,माजी नगरसेवक राजेश जयस्वाल, दिनेश कोचे,राकेश मिश्रा,शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख रुपेश झाडे,राष्ट्रवादी सामाजिक न्याय आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष नरवाडे,युवक काँग्रेसचे राज्य सचिव अश्विन बैस,माजी उपसरपंच दिलीप मेंढे, माजी उपसभापती प्रमिलाताई पवार,पुरुषोत्तम रागीट, दुर्योधन ढोणे,शैलेश थोराणे,योगेश चरडे, कंठीरामजी तागडे,ताराबाई जंगले,बेबीबाई वानखडे,निर्मलाबाई नागपूरकर यांचे समितीचे प्रमोद भोवरे,गौतम तिरपुडे इत्यादी पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ. विजय देशमुख यांनी बाबासाहेब आंबेडकरां मुळे आज देशातील नागरिकांना समानतेचा अधिकार मिळाल्याचे सांगून आंबेडकर जयंती च्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.तदनंतर विविध रथावर आकर्षक झाॅकी सह ही भव्य रॅली ढोल-ताशांच्या गजरात अमरावती महामार्गाने भ्रमण करीत धम्मकिर्ती नगर येथील बौद्ध विहारात पोहोचली.येथे बुद्ध वंदना घेऊन रॅलीची समाप्ती करण्यात आली.रॅलीत सहभागी नागरिकांसाठी जागोजागी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती.कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता समितीचे पदाधिकारी प्रमोद भोवरे,गौतम तिरपुडे,अशोक गडलींगे,नितेश जंगले,सुरज वानखेडे,बाबुराव वासनिक,पंडितराव भोरगडे,राजू भोवते,दिलीप भोरगडे, भिमराव कांबळे,किशोर नागपूरकर,मनोज भागवतकर,देवा दिवे,देवानंद राऊत, सोनू रामटेके, जितेंद्र बागडे, इत्यादींनी अथक परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे संचालन राजेश जंगले तर आभार आशिष नंदागवळी यांनी मानले. रॅलीदरम्यान वाडी पोलिसांचा चोख बंदोबस्त दिसून आला.