तरुण युवकाचा खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यूने कुटुंबियात संताप !

1794

तरुण युवकाचा खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यूने कुटुंबियात संताप !

# रुग्णालया विरोधात पोलिसात तक्रार दाखल 

# युवक काँग्रेसने केली तपास व कार्यवाहीची मागणी 

वाडी (प्र): परिसरातील टेकडी वाडी निवासी युवकाचा नागपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने परिवारात आक्रोश व्यक्त होत आहे. कुटुंबीयांनी रुग्णालय प्रशासनाची दुर्लक्षितता व चुकीच्या उपचाराने निधन झाल्याचा आरोप लावला असून रुग्णालया विरोधात सदर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

यासंदर्भात परिवार व युवक काँग्रेसचे राज्य सचिव अश्विन बैस व मृतकाची आई सविता तभाने,विक्की ढोके यांनी सांगितले की टेकडी वाडी गौतम नगर निवासी प्रणय तभाने वय -२९ वर्ष युवकाला पोटदुखी च्या कारणाने आधी छावणी येथील डॉ.राजेश सिंघानिया यांच्या शुभम नर्सिंग होम मध्ये भरती करण्यात आले होते.भरती करतेवेळी युवकाची स्थिती व्यवस्थित होती.दोन दिवस येथील डॉक्टरांनी उपचार केला परंतु त्याची प्रकृती ठीक होऊ शकली नाही.सर्व तपासण्या अंती त्याला काय रोग झाला ? हे डॉक्टर परिजनांना सांगू शकले नाही.शुक्रवारी त्याची प्रकृती अधिक बिघडल्याने त्याला येथील डॉक्टरांनी एल.आय.सी. चौकातील त्यांच्याच दुसऱ्या विम्स नामक रुग्णालयात दाखल करण्याचे परिवाराला सुचवले.परिवारांनी सूचने अनुसार त्याला बुधवारी तिथे दाखल केले असता त्याला सरळ आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. येथे त्याची प्रकृती अधिक बिघडली.परंतु तरीही डॉक्टरांनी त्याला काय बिमारी झाली हे सांगितले नाही.कोणत्या रोगावर उपचार सुरू आहे या संदर्भात परिवारांना काहीही माहिती दिली नाही. त्यांच्यानुसार त्याला कोणती बिमारी आहे हेच डॉक्टरांना माहीत नव्हते.जेव्हा रोगाचा पत्ताच नाही तर तीन दिवसपर्यंत त्याला कोणती औषधी देऊन त्याचा उपचार करीत होते हेच कळले नाही.? यामुळे स्पष्ट दिसून येते की बिमारीचे निदान न करता त्याला औषधी दिल्या जात होती. शुक्रवारी मध्यरात्रीला रुग्णालयात त्याचा मृत्यू होण्याची घोषणा रुग्णालयाने करताच तेथे उपस्थिताना धक्का बसून एकच आक्रोश निर्माण झाला.त्यांनी या रुग्णालयातील प्रमुख डॉक्टरला घटनास्थळावर बोलविण्याची मागणी केली व त्यांना अनेकदा बोलवल्या नंतर ही ते आले नसल्याने उपस्थितात असंतोष निर्माण झाला.यावरुन स्पष्ट झाले की रुग्णालयाच्या चुकीच्या उपचारानेच या युवकाला आपला जीव गमावा लागला.

यावेळी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात गोंधळ घालण्याआधीच रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना पाचारण केले होते व लवकरच पोलिस उपस्थित होऊन स्थितीला नियंत्रित केले.

संतप्त कुटुंबीय व युवक काँग्रेसने जेव्हा पोलिसात तक्रार दाखल करून कार्यवाहीची मागणी केली तेव्हा पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यावरच प्राथमिकी तक्रार नोंदविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. शुक्रवारी सकाळी मोठ्या संख्येने परिवार व युवक काँग्रेसचे कार्यकर्ते सदर पोलीस स्टेशनला पोहोचले. व या घटनेत दोषी रुग्णालय व डॉक्टरांच्या विरोधात तक्रार दाखल केली.यावेळी त्यांनी सांगितले की या गंभीर घटने विरोधात जिल्हाधिकारी कार्यालय व ग्राहक न्यायालयातही तक्रार दाखल करण्यात येईल. समाधान न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

शुक्रवारी दुपारी मृर्तकाचे पार्थिव शरीर पोस्टमार्टम पश्चात टेकडी वाडी स्थित त्याच्या निवासस्थानी आणण्यात आले. यावेळी तरुण मुलगा गेल्याने परिसरात गंभीर परिस्थिती दिसून आली.तद्नंतर टेकडी वाडी स्मशानभूमीत प्रणयचा शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आला.यावेळी कुटुंबीयांनी रुग्णालयाचे विरोधात तपास व कार्यवाहीची मागणी केली आहे. परिसरात मात्र तरुण मुलगा गेल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत होती.

# प्रतिक्रिया –

रुग्णालयाने मृतक रुग्ण प्रणय तभाने याच्या उपचारकडे दुर्लक्ष केले नाही.तो पोटदुखी च्या कारणाने दाखल झाल्याने सर्व प्रकारच्या चाचण्या केल्या.त्या अनुषंगाने त्याला औषधी दिल्या मात्र तरीही आराम पडला नाही.दरम्यान पिलिया सारखा आजार वाटत असल्याने आमच्याच दुसऱ्या रुग्णालयात पालकाच्या संमतीने दाखल केले.परंतु तिथे त्याची प्रकृती अजून खालावली.नेमके त्याला कोणता आजार झाला हे आम्ही समजू शकलो नाही.आजार वाढल्याने त्याचे निधन झाले.आता पोस्ट मार्टम नंतरच मृत्यूचे खरे कारण कळू शकेल

डॉ.राजेश सिंघानिया

संचालक,शुभम-विम्स रुग्णालय,नागपूर