ट्रक अपघातात विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू 

2214

ट्रक अपघातात विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू

# परीक्षा देण्यासाठी घरून निघाला असता दुर्घटना!

वाडी (प्र): लाव्हा-फेटरी मार्गावर बोढाळा जवळ मंगळवारी दुपारी ३.३० च्या दरम्यान ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात (To overtake truck student accident) एका युवकाला आपला जीव जागीच गमवावा लागला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतकाचे नाव सौरभ चिरकुटराव वानखडे वय- 23 वर्षे,रा.उपरवाही वार्ड क्रं.1 ता.कळमेश्वर आहे.सौरभ आपली दुचाकी क्रं. MH40-CF/5993 ने दुपारी 2.00 च्या दरम्यान घरून वाडी स्थित एका परीक्षा केंद्रावर परीक्षा द्यायसाठी निघाला होता.

फेटरीवरून वाडी कडे येत असताना बोढाळा जवळ त्याला काहीतरी विसरल्याचा भास झाला व तो पुन्हा दुचाकी वळवून फेटरीकडे जायला निघाला असता बोढाळा जवळ त्याच दिशेने जाणारा ट्रक क्रं.MH31-W/7819 ला ओव्हरटेक करण्याच्या नादात त्याचे दुचाकी वरील संतुलन बिघडले व तो ट्रकच्या मागच्या चाकात आला जवळपास 50 फूट ट्रकने त्याला पुढे घासत नेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

आजूबाजूच्या नागरिकांना ही घटना माहिती होताच त्यांनी घटनास्थळावर धाव घेतली तोपर्यंत ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला होता.वाडी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचून शवाचा पंचनामा केला व शवाला उत्तरीय तपासणी करिता नागपूर स्थित मेयो रुग्णालयाला पाठविले.

ही घटना मृतक विद्यार्थ्यांच्या घरी समजताच एकच खळबळ उडाली व एकुलता एक मुलगा गेल्याने परिवारा सह गावात दुःख व्यक्त करण्यात आले.वाडी पोलीसानी ट्रक ला जप्त केले असून पुढील तपास सुरू आहे.