आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते सुभाष गजभिये यांचे अखेर निधन!

135

आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते सुभाष गजभिये यांचे अखेर निधन!

# उड्डान पूल निर्माण कंपनीत झाला होता अपघात!

वाडी (प्र): वाडी आंबेडकर नगरचे निर्माते बुद्ध.शंकररावजी गजभिये यांचे धाकटे पुत्र व आंबेडकरी चळवळीतील प्रमुख कार्यकर्ते सुभाष शंकरराव गजभिये वय-५९ वर्षे यांचे शनिवारी अखेर उपचारा दरम्यान निधन झाल्याने परिवारासह डॉ.आंबेडकर नगरात शोककळा पसरल्याचे दिसून आले.

प्राप्त माहितीनुसार नागपूर-अमरावती महामार्गावर मारुती सेवा च्या बाजूला उड्डाण पुलाचे काम करणारी टी.एन.टी.इन्फ्रा कंपनीत ते ओरीयंटल असोसिएट च्या वतीने सुरक्षा रक्षकाचे काम करीत होते.दि.16.03.23 गुरुवार ला रात्री 11 वा. चे दरम्यान मुख्य प्रवेशद्वाराचे लोखंडी बॅरियर खाली ओढत असताना त्यांचे डोक्यावर पडल्यामुळे मान व मेंदूला गंभीर दुखापत झाली होती. यामुळे त्यांना सदर स्थित विम्स रुग्णालयात आयसीयू मध्ये भरती करण्यात आले होते. तदनंतर त्यांच्यावर किरकोळ शस्त्रक्रियाही करण्यात आली होती.
परंतु उपचाराला प्रतिसाद न देता दि. 25 मार्चला सकाळी 10 चे दरम्यान त्यांचे निधन झाले.

रविवारी 26 ला दुपारी 12 वा.डॉ.आंबेडकर नगर येथील घाटावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येईल.