गरीब विद्यार्थिनीला खाजगी शाळेत दिला निशुल्क प्रवेश

293

गरीब विद्यार्थिनीला खाजगी शाळेत दिला निशुल्क प्रवेश

# टुगेदर वी फाईट फाउंडेशनचे प्रशंसनीय कार्य

वाडी (प्र): वाडी-दवलामेटी क्षेत्रातील सामाजिक संस्था टुगेदर वी फाईट फाउंडेशन ने परिसरातील गरीब विद्यार्थिनी आरुषी शिवकुमार गरुड हिला खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश देण्याचे प्रशंसनिय कार्य केले.

संस्थेचे प्रमुख राजकुमार वानखेडे यांनी सांगितले की,आरुषी च्या परिवाराची आर्थिक परिस्थिती ठीक नसल्याने तिच्या शिक्षणात अनेक अडथळे येत होते. आई-वडील मजुरी करून चांगल्या शाळेत इच्छा असूनही तिला शिक्षण देऊ शकत नव्हते.वडील शिवकुमार गरुड ने एका कार्यक्रमात ही समस्या टुगेदर वी फाईट फाउंडेशनच्या समोर ठेवून सहकार्याची मागणी केली.

मुलीच्या शिक्षणाचे स्वप्न साकार करण्याच्या उद्देशाने संस्थेचे संस्थापक राजकुमार वानखेडे, सुभाष जोशी यांनी जवळच असलेल्या वडधामना स्थित कारमेल अकॅडमी शाळेचे प्राचार्य यांच्याशी चर्चा करून सहायता करण्याचा अनुरोध केला.व वर्षभराचे शिक्षण शुल्क माफ करून पुढील शिक्षणात आधार देण्याची हमी दिली.संस्थेचा अनुरोध मान्य करीत शाळेने आरुषी हिला निशुल्क प्रवेश देण्यास मान्यता दिली.यावेळी आरुषी च्या चेहऱ्यावर आनंदाश्रू दिसून आले.

या सामाजिक उपक्रमात संस्थेचे नंदकुमार सोनुले, शिवप्रसाद बांगरे,गीता कुर्वे,दीपक कोरे,राजेश दाते इत्यादींनी सहकार्य केले.