प्रतापनगर विद्यालयात जुन्या पेन्शन बाबत नारे- निदर्शने

126

प्रतापनगर विद्यालयात जुन्या पेन्शन बाबत नारे- निदर्शने

नागपूर (ता.१५): राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी शेकडो कर्मचारी संघटनांनी राज्यव्यापी बेमुदत संप पुकारला आहे. याचे पडसाद राज्यभर मोठ्या प्रमाणात पडले असून प्रतापनगर माध्यमिक विद्यालय येथेही या अनुषंगाने दुसऱ्या दिवशी संपाला जाहीर पाठिंबा देत नारे-निदर्शने करण्यात आले.

या नारे-निदर्शने कार्यक्रमात शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका सुनंदा गौरकर,विजय वानखडे, मनोज पवार,धनश्री तरासे,वंदना काळे,नंदिनी सावसाकडे, विशाल चव्हाण,पवन नेटे,प्रियंका धुवे,आशाबाई दहीकर,सचिन भोंगाडे इत्यादींनी या वेळेस सरकारच्या विरोधात एकच मिशन-जुनी पेन्शन,..अशी-कशी देत नाही,घेतल्याशिवाय राहत नाही,.. पेन्शन आमच्या हक्काची-नाही कुणाच्या बापाची.. अशा प्रकारच्या घोषणा देऊन आपला रोष व्यक्त केला.

तदनंतर शाळेच्या मुख्याध्यापिका मंजुश्री टिल्लू यांना शिक्षकांच्या या शिष्टमंडळाने संपाबाबतचे रीतसर निवेदन दिले.