महिलादिनी वाडीत कर्तृत्ववान महिलांचा सत्कार 

125

महिलादिनी वाडीत कर्तृत्ववान महिलांचा सत्कार 

# टुगेदर वी फाईट फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम

वाडी(प्र): जागतिक महिला दिनाचे(international women’s day) औचित्य साधून टुगेदर वी फाईट फाउंडेशन द्वारा समाजातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करून एक आदर्श निर्माण केला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला फाउंडेशनचे संचालक राजकुमार वानखेडे यांनी सावित्रीबाई फुले,माता रमाई यांच्या छायाचित्राला माल्यार्पण करून अभिवादन केले. तदनंतर कर्तुत्ववान महिला संध्या वारजुरकर व प्रणिता ओरके यांचा गुलाब पुष्प,स्मृतिचिन्ह व साडी देऊन भावपूर्ण सत्कार केला. यावेळी फाऊंडेशनचे संचालक राजकुमार वानखडे यांनी संध्या वारजूकर या दिव्यांग असूनही आपल्या स्व:कर्तुत्वाने मुलांना मोठे केले तर प्रणिता ओरके यांनी ऑटो चालवून आपले कुटुंब सांभाळले या महिलांपासून इतर महिलांनी प्रेरणा घेण्याचे त्यांनी आवाहन केले. संचालन नंदकुमार सोनुले यांनी तर आभार ज्योती सोमकुवर यांनी मानले. कार्यक्रमाला शिवप्रसाद बांगरे,सुभाष जोशी,गीता कुर्वे,शारदा कोरे,रीता परमार,ज्योती सेगडणे,प्रतिभा डोंगरदिवे,सुनील कुर्वे,दीपक कोरे,दादारावजी इंगळे,विलास कोरे, संदीप वानखेडे,आयुष सोनूले इं. सभासद उपस्थित होते.