वाडी न.प.चा महामार्गा शेजारील अतिक्रमणावर  हातोडा

395

वाडी न.प.चा महामार्गा शेजारील अतिक्रमणावर  हातोडा

# भारी पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण साफ!

वाडी(प्र): वाडी परिसरातून जाणाऱ्या नागपूर- अमरावती महामार्गाच्या दोन्ही बाजूला झालेले दुकानाचे स्थायी अस्थायी अतिक्रमण वाडी नगरपरिषदे द्वारा मोठ्या पोलीस बंदोबस्तात गुरुवारी हटविण्यात आले.प्राप्त माहितीनुसार सध्या नागपूर-अमरावती महामार्गावर उड्डाण पुलाचे काम तीव्र गतीने सुरू आहे यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहतुकीचा रोजच खोडंबा होत तर आहेच महामार्गचे रुंदीकरण आदी साठी ही अतिक्रमणे अडथळे ठरत होते. हाय वे प्राधिकरण व पोलीस विभाग व जिल्हा प्रशासनाचे निर्देश मिळताच महामार्गाच्या या दोन्ही बाजूंच्या अतिक्रमणांवर गुरुवारी सकाळी दहा वाजता बुलडोजर चालवला.एकीकडे नगरपरिषद स्थापन होऊन ८ वर्षाचा कालावधी लोटला.परंतु अद्याप या ठिकाणी भाजी बाजाराची वैकल्पिक व्यवस्था या छोट्या व्यवसायिकांसाठी करण्यात आलेली नाही. वैकल्पिक व्यवस्था न झाल्याने जीवन निर्वाह हेतू हे फुटपाथ दुकानदार रस्त्यावरच बसून आपला व्यवसाय/उदरनिर्वाह करतात. दरम्यान ८ महिन्यापूर्वी वाडी-दत्तवाडी क्षेत्रातून उडान पुलाचे निर्माण कार्य प्रारंभ झाल्याने निर्माण कंपनी व पोलीस विभागाला सुरळीत वाहतूक संचालन व दुर्घटना होऊ नये यासाठी नियोजन करावे लागले.दोन्ही बाजूचे मार्ग अरुंद असल्याने या वाहतुकीला अतिक्रमण व व्यावसायिकामुळे मोठ्या संकटाचा सामना करावा लागत होता.दरम्यान नागरिक व वाहतूक विभागाच्या तक्रारीही नगरपरिषदेला प्राप्त झाल्या होत्या.परिस्थितीला पाहता वाडी नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ.विजय देशमुख यांनी अतिक्रमण हटविण्याचे नियोजन बनविले.गुरुवारी सकाळी नगरपरिषदेच्या हद्दीपासून दत्तवाडी कडे जाणाऱ्या महामार्गावर सर्व नगरपरिषद कर्मचारी जेसीबी मशीन व आवश्यक साधना सह एकत्रित झाले.वाडी पोलीस व वाहतूक पोलिसांच्या भारी बंदोबस्तात अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईला प्रारंभ केला.सायंकाळी ५ वाजेपर्यंत एमआयडीसी वळणापर्यंतच्या मार्गाच्या दोन्ही बाजूचे अतिक्रमण हटविण्यात आले. व या ठिकाणी पुन्हा अतिक्रम होऊ नये या दृष्टीने नगरपरिषदे द्वारा एक विशेष दस्ता बनवून नियमित निरीक्षण करण्याची सुचविले.निर्देशाचे उल्लंघन करण्यावर कायदेशीर कार्यवाही करणार असल्याचे मत मुख्याधिकारी विजय देशमुख यांनी व्यक्त केले.दुसरीकडे आजच्या कार्यवाही पासून बेदखल झालेले व्यवसायिक रोजी रोटी पासून वंचित झाल्याने दुःखी होते. पथवेक्रेत्याची नप ने नोंदणी कशासाठी केली?त्यांना कर्ज देत आहे व दुसरीकडे दुकाने हटविण्यात येत आहे ही नप ची दुट्टपी भूमिका दिसून येते. नगरपरिषद प्रशासनाने मागील ८ वर्षापासून व्यावसायिकांसाठी व्यवसायिक मार्केटचे आश्वासन दिल्यानंतरही ते बनविले नाही,यासाठी मजबुरीने फुटपाथ वर व्यवसाय करत असल्याचे सांगितले व आता नगर परिषदेने जबाबदारी चे निर्वहन करून क्षेत्रातील व्यवसायिक व नागरिकांच्या सुविधांसाठी न.प.मार्केट संकुल कधी निर्माण करते असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.