वाडीत डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन 

282

वाडीत डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन 

वाडी(प्र): डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त वाडीत ठिकठिकाणी अनुयायांनी अभिवादन केले. वाडी अमरावती महामार्ग स्थित डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक पुतळा प्रांगणात माजी जि.प.सदस्य दिनेश बन्सोड,राष्ट्रवादी सामाजिक न्याय आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष नरवाडे,नागपूर तालुका ग्रामीण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश कोकाटे,माजी नगरसेवक प्रमोद भोवरे,दिनेश कोचे,आशिष नंदागवळी,माजी सरपंच भीमराव लोखंडे,माजी उपसरपंच दिलीप मेंढे,माजी ग्रा.पं.सदस्य दुर्योधन ढोणे,कंठीरामजी तागडे इं.नी डॉ. बाबासाहेब आंबेडकर,तथागत बुद्ध,सम्राट अशोक यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून वंदन केले.तदनंतर पंचशील ध्वज फडकविण्यात आला.कंठीरामजी तागडे यांनी सामुदायिक बुद्ध वंदना घेतली.

यावेळी समितीचे पदाधिकारी राजेश जंगले,गौतम तिरपुडे,भीमराव कांबळे,किशोर नागपूरकर,दिलीप भोरगडे,राजू भोवते,बाबुराव वासनिक,देवा दिवे,देवा राऊत,सह अनिल पुंड,ईश्वर उके,अशोक गडलिंगे,मंगेश चोखांद्रे,प्रभाकर ठवरे,भीमराव शेंडे,धनपाल गजभिये,बाबुराव लोणारकर,नेहारिका पोटपोसे,रोशन बागडे,प्रवीण तायडे,नितीन वाघमोडे, जितेंद्र पानतावणे इं उपस्थित होते. संचालन समितीचे पदाधिकारी गौतम तिरपुडे यांनी केले.