वाडीत वंचित बहुजन आघाडी च्या कार्यालयाचे उद्घाटन 

443

वाडीत वंचित बहुजन आघाडी च्या कार्यालयाचे उद्घाटन 

वाडी (प्र): नागपूर-अमरावती महामार्गावरील वाडी स्थित डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारका नजीक नुकतेच वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयाचे उद्घाटन राष्ट्रीय युवा नेते सुजातदादा आंबेडकर यांच्या हस्ते विधिवत फीत कापून व फटाक्याची आतिषबाजी करून करण्यात आले.

माजी जि.प.सदस्य दिनेश बन्सोड यांच्या पुढाकाराने निर्मित या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी राष्ट्रीय युवा नेते सुजातदादा आंबेडकर यांनी हे कार्यालय राजकीय भूमिका ठेवून वंचितच्या चळवळीचे केंद्र व्हावे असे मनोगत व्यक्त केले.उद्घाटन प्रसंगी वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा,नागपूर जिल्ह्याचे प्रभारी कुशल मेश्राम,पूर्व विदर्भ संयोजक राजू लोखंडे, नागपूर शहराध्यक्ष रवी शेंडे हे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी दिनेश बन्सोड यांनी परिसरातील वंचित,उपेक्षित,दुर्लक्षित,पीडित व अन्यायग्रस्त लोकांना या कार्यालयाच्या माध्यमातून सहकार्य करणार असल्याची ग्वाही दिली.

उद्घाटन कार्यक्रमाला पक्षाचे पदाधिकारी ट्रान्सपोर्ट व कामगार युनियनचे जिल्हाध्यक्ष विवेक वानखेडे, युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष मनीष बोरकर,जिल्हा उपाध्यक्ष सुमेध गोंडाने,अतुल शेंडे, ईश्वर उके,ॲड.रविंद्र बोबडे,माजी नगरसेवक प्रमोद भोवरे,माजी उपसरपंच दिलीप मेंढे,माजी ग्रा.पं.सदस्य कंठीरामजी तागडे,गीताबाई उके,सुजाता वानखेडे सह मोठ्या संख्येने महिला-पुरुष व युवक उपस्थित होते.