वंचित बहुजन युवा आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी मनीष बोरकर यांची नियुक्ती 

286

वंचित बहुजन युवा आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी मनीष बोरकर यांची नियुक्ती 

वाडी (प्र): वंचित बहुजन युवा आघाडीच्या नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी वाडी निवासी सामाजिक कार्यकर्ते व व्यवसायी मनीष बोरकर यांची नुकतीच युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष डॉ.निलेश विश्वकर्मा यांनी नियुक्ती करून तशा आशयाचे पत्र दिले.

या नियुक्तीबद्दल मनीष बोरकर यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर,महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकूर,राष्ट्रीय युवा नेते सुजातदादा आंबेडकर,युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. निलेश विश्वकर्मा यांचे आभार मानले.तर जिल्ह्यात युवकांना पक्षाच्या ध्येयधोरणाशी जोडून पक्ष संघटन वाढवण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मनीष बोरकर यांच्या नियुक्ती बद्दल माथाडी कामगार व ट्रान्सपोर्ट युनियनचे जिल्हाध्यक्ष विवेक वानखेडे सह सुमेध गोंडाने,अतुल शेंडे,नागेश बोरकर,रोहित राऊत,राजू रंगारी,राजेश गोपाळे,विनय उमाटे,अमन जामगडे,विवेक शेवाळे,विवेक गायकवाड,अर्चना काळबांडे सीमा शेंडे,संदीप बलबीर,चेतन गमे,अश्विन गावंडे स्वप्निल गजभिये,अश्विन पाटील,रितेश वळतकर, सुरज भलावी,समीर ठाकरे,मधुकर खांडेकर,अमोल डोंगरवार,ललित चहांदे इत्यादींनी अभिनंदन केले.