ट्रकच्या धडकेत पती ठार,पत्नी गंभीर

1139

ट्रकच्या धडकेत दुचाकी दुभाजकावर आदळल्याने इसम ठार 

# अज्ञात ट्रक चालक वाहनासह घटनास्थळावरून पसार

वाडी (प्र): वाडी शहरात उड्डाणपुलाचे निर्माण कार्य सुरू असल्याने वाहतुक मोठ्या प्रमाणात प्रभावित होऊन दिवसेंदिवस अपघाताच्या संख्येत वाढ होत आहे. अशाच प्रकारची दुर्घटना (Truck Accident) आज सकाळी 10.30 च्या सुमारास वाडी पोलीस ठाण्यासमोर घडली ज्यात एका इसमाला आपला प्राण गमवावा लागला.

वाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतक आठवा मैल गणेश नगर निवासी महेश मिश्रा वय-52 असून ते पत्नी सरिता सोबत दुचाकी ॲक्टिवा क्र. MH-40/BA-6228 ने आठवा मैल वरून दत्तवाडी कडे जात होते. यावेळी पत्नी सरिता ही दुचाकी चालवीत होती.दरम्यान वाडी पोलीस स्टेशन समोर अरुंद रस्त्यावर मागून आलेल्या अज्ञात ट्रकची या दुचाकीला जबर धडक लागली. या धडकेत हे दांपत्य दुचाकीसह बाजूलाच असलेल्या सर्विस रोडच्या दुभाजकावर आदळले. महेश पत्नीसह खाली पडल्याने त्यांचे डोके,कान व हाताला जबर मार लागून तो बेशुद्ध झाला.आजूबाजूला उपस्थित नागरिकांनी त्यांना तातडीने नजीकच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याचे कारण सांगून त्यांना नागपूर स्थित शासकीय रुग्णालयात हलविण्याचे  सुचविले.

वाडी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच ते तातडीने घटनास्थळावर दाखल झाले व रुग्णाला नागपूर येथील मेयो रुग्णालयात दाखल केले असता येथील डॉक्टरांनी तपासणी अंती महेशला मृत घोषित केले.

या अपघातात मृत महेश च्या पत्नीला किळकोळ दुखापत झाला असुन ट्रक चालक नागपूर चा दिशेने वाहनासह पळून गेला आहे. पुढील तपास वाडी पोलीस करीत आहेत.