लाव्ह्यात ‘होकरे होक,होकरे होक’च्या गजरात धावल्या बैलाविना बंड्या 

1640

लाव्ह्यात ‘होकरे होक,होकरे होक’च्या गजरात धावल्या बैलाविना बंड्या

# २५० वर्षाची परंपरा गावाने जोपासली

# चमत्कार नसून विज्ञान आहे – अनिस

वाडी(प्र) : वाडी जवळील लाव्हा येथे गेल्या २५० वर्षांची परंपरा असलेली सोनबा बाबा यात्रा होळीच्या पंचमिला भरली. या जत्रेत बैला विना बंड्या धावणे (Bullock cart run without oxen) पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती.बैला विना बंड्या चालविण्याचा उत्सव कोरोना मुळे मागील दोन वर्षांपासून कार्यक्रमाला काही प्रमाणात कमी करण्यात आले होते.त्यामुळे यावर्षी या उत्स्वाला अफाट गर्दी दिसून आली. गोरले परिवारातील आठवे वंशज गजानन गोरले यांनी श्री.सोनबा बाबा ची विधीवत पूजा अर्चा केली. तदनंतर भक्तांनी गोरले महाराजांना काही वेळ पाळण्यावर झुलविले. बाजूलाच रस्त्यावर एका मागून एक बांधलेल्या बंड्यावर गावकरी उभे झाले होते काही गोरले महाराज पहिल्या समोरच्या पहिल्या बंडीवर चढून लिंबू फेकत ‘होकरे होक,होकरे होक’चा गजर केला व बैला विना बंड्या १ किमी.धावल्या.हा उत्सव पाहण्यासाठी हजारो नागरीक नागपूर जिल्ह्यातून आणि दूरदूरच्या ठिकाणाहून जमले होते. गावात पाहुण्यांची रेलचेल असून रात्री मनोरंजनात्मक कार्यक्रम झाले . गावातील,परिसरातील नागरीकांनी या उत्सवाचा आनंद घेतला.सोहळा शांततेत पार पडण्यासाठी सरपंच ज्योत्स्ना नितनवरे,उपसरपंच रॉबिन शेलारे पो.नि. प्रदीप रायण्णावार,माजी उपसरपंच महेश चोखांद्रे, माजी उपसभापती सुजित नितनवरे,गणेश हिरणवार(सोनबा बाबा समिती अध्यक्ष)यांनी अथक प्रयत्न केले .

प्रतिक्रिया – अनिस 

या संदर्भात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती चे पदाधिकारी हरीश देशमुख,सुनील वंजारी,किरण खोडे,छाया सावरकर,बबलू बहादूरे,निलेश पाटील, भगवान खरात,सुधीर आंडे ने निवेदन जारी करून सांगितले की बैला विना बंड्या धावन्यात कोणतीही बुवाबाजी नसून वैज्ञानिक दृष्टीकोन आहे.न्यूटनचा पहिला गतिविषयक नियम लागू पडतो एखाद्या वस्तूला गती दिली तर ती गतीमान होते.बंड्यावर लोकं बसतात व त्याला बल दिल्या जाते त्या बलामुळे बंड्या गतीमान होतात हे त्यातील वैज्ञानिक तत्व आहे.यात काही मंत्र-तंत्र नसून विज्ञान आहे .

या विशेष कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी समिती पदाधिकारी गणेश पटेल हिरणवार, जिप. सदस्य ममता धोपटे, सरपंच ज्योत्स्ना नितनवरे, उपसरपंच रॉबिन शेलारे, सामाजिक कार्यकर्ता दत्तू पैठनकर, पूर्व जिप. सदस्य सुजीत नितनवारे, रामेश्वर ढवरे,ग्रा.प सदस्यगण महेश चोखान्द्रे, जितेश पिडेकर,साधना वानखेडे, पांडुरंग बोरकर, मंगेश चोखान्द्रे,सुनंदा चोखान्द्रे, पूजा तभाने, आकाश पवार ,कपिल खडसे, धनवंती भिवनकर,सह प्रकाश डवरे,मोरेशवर वरठी,अशोक वानखेडे,संजय सावरकर,नितिन गोरले, शेषराव गोरले, देवनाथ गोरले ,मोरेश्वर गोरले, मोरेश्वर वरठी, अशोक वानखेडे, महादेव वानखेडे ,सुरेश ढवरे, अशोक अगरकर,दत्तू वानखेडे, प्रकाश गोरखेड़े, पिंटू आगरकर, विलास ढोने, अभिषेक पैठणकर ,विवेक आगरकर, हर्षल वानखेडे, विक्की ढवरे, श्रृषभ पुसाम, आर्यन उके, पराग धुर्वे, पं.स. सदस्य प्रीती अखंड, पूर्व सरपंच जीजाबाई धुर्वे, राजकुमार बोरकर, भारत नितनवरे, आकाश चोखांद्रे, योगेश्वर लोखंडे, अमोल डोईफोडे, सतीश तभाने, सागर धोंगडे, आशिष वानखडे, संजय सावरकर, कैलाश ढोणे, शिवराज नितनवरे, प्रकाश नगरारे, सुभाष डोईफोडे, सुर्यवंशी पाटील ई. नी सहकार्य केले.