वाडीत दहावीच्या शालांत परीक्षेला उत्साहात प्रारंभ 

78

वाडीत दहावीच्या शालांत परीक्षेला उत्साहात प्रारंभ

# वाडी अंतर्गत ४ परिक्षा केंद्रावर ७३५ विद्यार्थी 

वाडी (प्र ) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात येणारी शालांत प्रमाणपत्र परिक्षेला काल गुरुवारी २ मार्च पासून सुरुवात झाली.वाडी अंतर्गत ४ परिक्षा केंद्रावर एकूण ७३५ विद्यार्थ्याची प्रथम भाषा मराठी पेपर ला उपस्थिती दर्शविली.जवाहर नेहरू विद्यालय या केंद्रावर १३० विद्यार्थ्यांपैकी १२६ उपस्थित होते.या केंद्रावर प्रभारी मुख्याध्यापक उमेश चौरे यानी केंद्र प्रमुख म्हणून कार्य सांभाळले.विश्वनाथ बाबा हायस्कुल या केंद्रावर ३३२ विद्यार्थापैकी ३१७ विद्यार्थी उपस्थित होते.या केद्रावर मुख्याध्यापक राजेश बिडवाईक यांनी क्रेंद्र प्रमुख म्हणून कार्य साभाळले .प्रगती विद्यालय या केंद्रावर १८३ परिक्षार्थ्या पैकी १७८ उपस्थित होते.या केंद्रावर मुख्याध्यापिका नंदीनी पोजगे यांनी केंद्र प्रमुख जबाबदारी पार पाडली .

जिल्हा परिषद हायस्कुल डिफेन्स या केंद्रावर११८ पैकी११४ उपस्थित होते.या केंद्रावर यावले मॅडम यांनी केंद्र प्रमुख म्हणून कार्य सांभाळले .

सर्वच परिक्षा केंद्रावर परिक्षा शांततेने पार पडली . काही परिक्षा केंद्रावर सी.सी.टिव्ही कॅमेरे लावण्यात आले होते तर काही केद्रावर नव्हते .

नियुक्त करण्यात आलेल्या स्थानिक बैठे पथकांनी आपाआपली जबाबदारी सांभाळून परिक्षा शांततेने पार पाडण्यास सहकार्य केले.वाडी पोलीस स्टेशन कडून प्रत्येक परिक्षा केंद्रावर सुरक्षा यंत्रणा पुरविण्यात आली होती .