जवाहरलाल नेहरू विद्यालयात डॉ.सी.व्ही.रमण जन्मदिन उत्साहात

228

जवाहरलाल नेहरू विद्यालयात डॉ.सी.व्ही.रमण जन्मदिन उत्साहात

जवाहरलाल नेहरू विद्यालयात विज्ञान प्रदर्शनी चे आयोजन

वाडी(प्र): येथील जवाहरलाल नेहरू विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात डॉ.सी.व्ही.रमण यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.यावेळी जवाहरलाल नेहरू महाविद्यालयाचे प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ.मनीषा भातुलकर,रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ.नितीन कोंगरे यांच्या हस्ते डॉ.सी.व्ही.रमण याच्या यांच्या फोटोला माल्यार्पण करून अभिवादन केले. तदनंतर विधिवत विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले.या विज्ञान प्रदर्शनीत विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी असलेल्या कलेची चुणूक दाखवत वेगवेगळ्या विषयांवर मॉडेल प्रस्तुत केले व त्याचे महत्त्वही समजावून सांगितले. प्रदर्शन विद्यालयाचे मुख्याध्यापक उमेश चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षिका प्रीती रामटेके, पंकज पाटील,उषा पांगुळ,सचिन डेहनकर, शुभांगी काळे यांच्या सहभागाने यशस्वी झाले.