लाव्हा येथे संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त अभिवादन

372

लाव्हा येथे संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त अभिवादन

वाडी,दि.24 :आदर्श बौद्ध विहार लाव्हा येथे जेष्ठ नागरिक मैत्री संघ,भारतीय बौद्ध महासभा,भिमाई महिला मंडल यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच संत गाडगे बाबा जयंती निमित्य अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला. या प्रसंगी जेष्ठ नागरिक मैत्री संघा चे मार्गदर्शक राजकुमार बोरकर,संघाचे माजी अध्यक्ष प्रकाश चोखांद्रे यांनी सर्वप्रथम संत गाडगेबाबा यांच्या फोटोला मारल्यावर पण करून अभिवादन केले. तदनंतर अंधश्रद्धा आणि अस्वच्छता यांनी बुरसटलेल्या समाजाला कीर्तनासारख्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारे संत गाडगेबाबा यांनी नागरिकांना दिलेला स्वच्छतेचा मंत्र सांगून त्यांनी केलेल्या कार्याचे अनुकरण करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाला सुदाम तभाणे,वंजारी साहेब,शेखर पाटील,समता सैनिक दल कमांडर बळीराम धोंगळे,महिला मंडल च्या पदाधिकारी शालिनी मेश्राम,इंद्रमता ठवरे सह गावातील नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भारतीय बौद्ध महासभा,भिमाई महिला मंडळ,समता सैनिक दल यांनी परिश्रम घेतले.संचालन शेखर पाटील यांनी तर आभार प्रदर्शन दामू ढोणे यांनी मानले.