वाडीत अल्पवयीन मुलीवर नराधम युवकाचा अत्याचार 

135

वाडीत अल्पवयीन मुलीवर नराधम युवकाचा अत्याचार

# लग्नाचे आमिष दाखवून केली ५ महिन्याची गर्भवती 

वाडी(प्र): वाडी पोलीस स्टेशन हद्दीतील नवनीत नगर येथे एका नराधम युवकाने १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याने व त्या मुळे ती ५ महिन्याची गर्भवती राहिल्याची संतापजनक घटना उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नराधम युवक अमन विजय ठाकरे वय-२१ वर्षे रा.नवनीत नगर, बौद्ध विहार जवळ याने जवळच राहणारी अल्पवयीन मुलगी प्रिया (बदललेले नाव) हिला प्रेमपाशात ओढून व लग्नाचे आमिष दाखवून एप्रिल २०२१ ते नोव्हेंबर २०२२ पर्यंत विविध ठिकाणी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.मात्र या मुळे नुकतेच तिची प्रकृती बिघडली व तिला उलट्या होऊ लागल्याने तिच्या आईने बजाज नगर स्थित एका खाजगी दवाखान्यात तिला उपचारासाठी नेले असता ती ५ महिन्याची गर्भवती असल्याचा प्रकार उघड झाला. व आता गर्भपात होत नसल्याचेही डॉक्टरांनी स्पष्ट केले. हे ऐकताच आई ला धक्काच बसला.हॉस्पिटलने लगेच याची माहिती बजाजनगर पोलिसांना दिली.बजाजनगर पोलिसांनी वाडी पोलिसांना संपर्क साधून घटनेची माहिती दिली. वाडी पोलिसांनी तत्परतेने कारवाई करीत नराधम युवक अमन ठाकरे याला ताब्यात घेतले. मुलीची वैद्यकीय तपासणी करून नराधम युवक अमन ठाकरे वर कलम ३७६,पोक्सो कायद्याअंतर्गत ४,८,१२ अन्वये कारवाई केली.पुढील तपास पो.नि.प्रदीप रायण्णावार यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती काळे करीत आहेत. या घटनेची माहिती परिसरात होताच नागरिकांत आरोपी विरोधात संताप निर्माण झाल्याचे समजते.