वाडीत अविवाहित तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या 

372

वाडीत अविवाहित तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या 

वाडी (प्र): धम्मकीर्ती नगर दत्तवाडी येथील एका अविवाहित तरुणाने घरातील सिलिंग पंख्याला गळपास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

प्राप्त माहितीनुसार रोशन उर्फ सचिन कमलदास राऊत वय-३२ वर्ष हा अविवाहित तरुण मागील अनेक दिवसापासून मानसिक तणावात होता. यामुळे त्याला बऱ्यापैकी दारूचे व्यसनही लागले होते.आई वडील व बहीण यांचे जनरल सामानाचे दुकान दत्तवाडी चौकात असून ते दिवसभर आपल्या कर्तव्यावर असायचे तर रोशन हा खाजगी काम करीत होता.घटनेच्या दिवशी गुरुवारी सर्व दुकानावर गेले असता रोशनने दुपारी घरातील पंख्याला साडीच्या ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली. सायंकाळी सात वाजता आई व बहीण घरी आल्यानंतर ही घटना उघडकीस आली असता एकच हाहाकार उडाला.वाडी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला व शव उत्तरीय तपासणी करता मेयो रुग्णालय नागपूर येथे पाठवले.पुढील तपास वाडी पोलीस करीत आहे.