होलीमिलन कार्यक्रम उत्साहात संपन्न

59

होलीमिलन कार्यक्रम उत्साहात संपन्न

# माजी जि.प.सदस्य दिनेश बन्सोड यांचे आयोजन

वाडी (प्र): फाल्गुन पौर्णिमेत संपन्न होणाऱ्या धुलीवंदन निमित्त माजी जि.प.सदस्य आयु.दिनेश बन्सोड यांचे निवासस्थानी ‘होलीमिलन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी सामाजिक,धार्मिक,शैक्षणिक,राजकीय क्षेत्रातील मित्रमंडळी व हितचिंतकांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन होलीमिलन कार्यक्रमात सहभाग नोंदवला.या स्नेहमिलन कार्यक्रमात राष्ट्रवादी सामाजिक न्याय आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष नरवाडे,माजी उपसरपंच दिलीप मेंढे,माजी नगरसेवक प्रमोद भोवरे,भीमसेनेचे जिल्हाध्यक्ष रोशन सोमकुवर, सामाजिक कार्यकर्ते गौतमभाऊ तिरपुडे, भीमरावजी कांबळे,किशोर नागपूरकर,पंडित भोरगडे,दिलीपभाऊ भोरगडे,बाबुराव वासनिक, राजू भोवते,गजानन वासनिक,सोनु रामटेके,फिरोज खान पठाण,सुधीर कांबळे,मनोज भागवतकर,नितीन वाघमोडे,प्रविण तायडे,चंदू सोंनपिंपळे,बबलू गजभिये,जितेंद्र पानतावणे,देवा दिवे,आनंद रामटेके,सचिन खोब्रागडे,फिरोज खान पठाण,केशव राऊत,प्रकाश वाटकर,भीमरावजी,राजू घरडे,रितेश सोमकुवर,स्वप्निल खोब्रागडे,पटवर्धन बाबा,राजेंद्र वासनिक,स्वराज रामटेके,लोमेश भारती कव्वाल,यावेळी उपस्थितांनी मद्यप्राशनाचा मनसोक्त आनंद घेत संगीताच्या तालावर ठेका घेत नृत्य सादर केले.