वाडीतील प्रलंबित समस्या मार्गी लावा – मनसे

582

वाडीतील प्रलंबित समस्या मार्गी लावा – मनसे

# वाडी मुख्याधिकाऱ्यांना दिले विविध समस्याचे निवेदन 

वाडी (प्र): महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाडी विभागा द्वारे नगरपरिषद वाडीचे मुख्याधिकारी विजय देशमुख यांना वाडीतील विविध प्रलंबित समस्याचे निवेदन देऊन लक्ष वेधले.

मंगलधाम सोसायटी प्रभाग क्रमांक २ येथील सोसायटीच्या मैदानाचे सौंदर्यीकरण, विकास नगर व शिवाजीनगर येथे सांडपाण्याच्या नाली निर्मिती, वाडी भागातील सर्व रेस्टॉरंट बार हॉटेल समोर पार्किंगची व्यवस्था नसताना न.प.ने एनओसी कशी दिली ? शिवाजीनगर वाडी येथील नालीचे उघडे चेंबर्स,टेकडी वाडी स्मशानभूमीचे सौंदर्यीकरण व निवाराचे दुरुस्तीकरण,वाडी शहरातील लहान मोठ्या नाल्यावर असलेले अनधिकृत बांधकाम,शिवाजीनगर येथील दोन रस्त्याचे सिमेंटीकरण,कंट्रोल वाडी येथील नाली उंच करणे, माऊली नगर येथे रस्त्याच्या दोन्ही बाजूला गट्टू बसवणे अशा विविध कामाचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाडी विभागातर्फे न.प. वाडी चे मुख्याधिकारी विजय देशमुख यांना देण्यात आले. निवेदन मनसे चे जिल्हाध्यक्ष आदित्य दुरुगकर यांच्या मार्गदर्शनात तालुका अध्यक्ष दिपक ठाकरे,संघटक महेश शाहू,राकेश चौधरी,धनराज गिरीपुंजे,नितीन पिटोरे,मुकेश मुंडेले,आकाश बाबर,अजिंक्य वाघमारे,प्रीतम कांपल्लिवार, सोमेश येडे,भोला सोनटक्के, गौरीशंकर मेश्राम,दिलीप गोंडेकर, सतीश चौधरी,आदित्य राऊत, पुष्पकांत मेश्राम सह महिला सेनेच्या अर्चना संजय ठाकरे,शशिकला बोंदरे,चंदा गोंडाने, उमाताई वानखेडे,आरती तराळे,आशा कटरे,अर्चना हेडाऊ इं.उपस्थित होते.