वाडीत हळदी-कुंकू निमित्त महिला मेळावा संपन्न !

271

वाडीत हळदी-कुंकू निमित्त महिला मेळावा संपन्न !

# पारंपारिक कार्यक्रमातून भारतीय संस्कृतीची जोपासना – वृंदा मेघे

# माजी सभापती सरिता यादव यांचा पुढाकार 

वाडी (प्र): वाडी येथील शिवशक्ती नगरातील वेणा बिलिंग सेंटर जवळील न.प.च्या राणी लक्ष्मीबाई उद्यानात नुकतेच माजी सभापती सरिता यादव यांच्या पुढाकाराने हळदी-कुंकू निमित्त महिलांसाठी विविध स्पर्धा आयोजित करून भव्य महिला मेळावा संपन्न करण्यात आला. कार्यक्रमाच्या आयोजिका माजी सभापती सरिता यादव यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाचा उद्देश प्रमुख अतिथींपुढे प्रस्तुत केला.

यावेळी प्रमुख अतिथी वृंदा समीर मेघे यांनी दीप प्रज्वलन करून या महिला मेळाव्याचे उद्घाटन केले.कार्यक्रमाला भाजपा महिला जिलाध्यक्ष अनुराधा अमीन,रामटेक लोकसभा प्रभारी लता गावंडे,जिला महामंत्री राजूताई भोले,प्रगति मंडल,माजी सभापती कल्पना सगदेव,मंडल अध्यक्ष ज्योति भोरकर,आनंदबाबू कदम प्रामुख्याने उपस्थित होते.

कार्यक्रमात उखाणे स्पर्धा,पैठणी साडी स्पर्धा, फुगडी डांस,फुगा फुगविणे इत्यादी अनेक स्पर्धात महिलां सहभागी झाल्या.

यावेळी प्रमुख अतिथी वृंदा मेघे यांनी महिलांनी पारंपारिक कार्यक्रमातून भारतीय संस्कृतीची जोपासना करण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांना अल्पोपहाराचे वितरण करण्यात आले.

यशस्वीतेसाठी गायत्री सुरकर, वनिता मुंगारे, राजश्री वागद्रे, सुवर्णा आत्राम, जान्हवी कडव,शुभांगी जावळकर, विशाखा धोटे,अर्पिता वंजारी, मीनाक्षी धोटे, ललिता ईश्वरकर,भारती शिरभाते, बेबीताई बारस्कर, वैद्य ताई, संगीता रावंदे,चंद्रकला पवार, आशा खेडकर, पुष्पा बारस्कर,मीना इरबडे इत्यादींनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाला परिसरातील महिलांची मोठ्या संख्येने गर्दी होती.

प्रस्तावना आयोजक सरिता यादव,संचालन निलिनी बड्डे तर आभार प्रगति मंडल यांनी मानले.