प्रतापनगर विद्यालयात शैक्षणिक प्रकल्प यंत्राचे थाटात उद्घघाटन

77

प्रतापनगर विद्यालयात शैक्षणिक प्रकल्प(प्रोजेक्टर)यंत्रांचे थाटात उद्घघाटन

# अत्याधुनिक शैक्षणिक प्रोजेक्टर मुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढणार – प्रा.गिरीश देशमुख

नागपूर (ता.21): प्रतापनगर शिक्षण संस्थेद्वारा संचालित प्रतापनगर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात नुकतेच शैक्षणिक प्रकल्प (प्रोजेक्टर) मशीनचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष प्रा.गिरीश देशमुख यांचे हस्ते विधिवत रिमोट चे बटन दाबून करण्यात आले. याप्रसंगी संस्थेच्या सचिव अनुपमा नाफडे,उपाध्यक्ष शंकर पहाडे, सदस्य गांवपांडे,मुख्याध्यापिका मंजुश्री टिल्लू,मुख्याध्यापक श्रावण सुरकार इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला माता सरस्वतीच्या फोटोला माल्यार्पण करून वंदन करण्यात आले.तद्नंतर प्रोजेक्टर चे रिमोट दाबून विधिवत उद्घाटन करण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांना संबोधित करताना प्रा.गिरीश देशमुख यांनी या प्रोजेक्टर मुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत नक्कीच वाढ होण्याची अशा व्यक्त केली व त्या पद्धतीच्या नवनवीन सूचना प्रोजेक्टरच्या माध्यमातून शिक्षकांनी शालेय अध्यापन करताना विद्यार्थ्यांना देण्याच्या सूचना केल्या.

यावेळी विद्यार्थ्यांना प्रोजेक्टवर चांद्रयान-३ ची संपूर्ण माहिती चित्रफितीसह दाखवण्यात आली. कार्यक्रमाला शाळेच्या शिक्षिका सुनंदा गौरकर,विजय वानखेडे,मनोज पवार,धनश्री तरासे,वंदना काळे,नंदिनी सावसाकडे,विशाल चव्हाण,पवन नेटे इत्यादी सह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार तेजराम बांगडकर यांनी केले.