वाडीत युवक काँग्रेसचे “हॅप्पी जुमला दिवस” आंदोलन
# केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी
वाडी(प्र): शनिवारी वाडीतील काटोल बायपास येथील महात्मा गांधी चौकात सायंकाळी युवक काँग्रेस च्या वतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खोट्या विकासाचे एप्रिल फुल निमित्त “हॅप्पी जुमला दिवस” आंदोलन केले.आंदोलनाच्या सुरुवातीला प्रमुख पदाधिकाऱ्यांनी महात्मा गांधींच्या फोटोला माल्यार्पण करून मोदी सरकार विरोधात तीव्र घोषणाबाजी केली.
महांगाईने होरपळलेली जनता,सिलेंडरची दरवाढ,बेरोजगारी,जुनी पेन्शन इं. विषयांवर घोषणाबाजी करीत मोदी सरकारचा निषेध नोंदवला.
प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सांगितले की,दरवर्षी दोन करोड रोजगार उपलब्ध करणार असल्याचा मोदींचा दावा खोटा सिद्ध झाला आहे.बेरोजगार युवकात यासंबंधी तीव्र आक्रोश आहे.सुशिक्षित युवकांना पकोडे तळण्यासाठी म्हटले जात आहे. ज्याचा निषेध करण्यासाठी व देशवासियांचे याकडे ध्यान आकर्षित करण्यासाठी १ एप्रिल “हॅप्पी जुमला दिवस”आंदोलन करण्यात येत आहे.
आंदोलन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत,नागपूर जिल्हा युवक कांग्रेस अध्यक्ष मिथिलेश कान्हेरे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव अश्विन बैस,वाडी शहराध्यक्ष शैलेश थोराणे, माजी उपनगराध्यक्ष राजेश थोराणे यांचे मार्गदर्शनात हिंगणा विधानसभा युवक कॉंग्रेस उपाध्यक्ष श्रीकांत ढोणे यांचा नेतृत्वात करण्यात आले.
यावेळी पंकज फलके,निखील पाटील,अतुल देरकर,सागर बैस, अश्पाक अहमद, निखिल कोकाटे,विकास वर्मा,अरुणा पगाडे,रूपाली जीवनकर,नीता मडावी, मीनल कोल्हे,युवराज ढोणे,दशरथ साखरकर,नरेश लोखंडे,राजू नागपुरे इ. कार्यकर्ते उपस्थित होते.