प्रियदर्शनी गृह निर्माण सहकारी संस्थेची वार्षिक सभा संपन्न

147

प्रियदर्शनी गृह निर्माण सहकारी संस्थेची वार्षिक सभा संपन्न

वाडी(प्र): धम्मकीर्ती नगर येथील प्रियदर्शनी गृह निर्माण सहकारी संस्थेची वार्षिक सभा नुकतीच संस्थेच्या कार्यालयात संपन्न झाली. सभेची सुरुवात सर्वप्रथम डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूतळ्याला माल्यार्पण करुण करण्यात आली.सचिव दीपक सुखदेवे यांनी मागील वर्षाचा जमा+खर्च सादर करून संस्थेच्या प्रगतीचा अहवाल सादर केला. तर संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कांबळे यांनी धम्मकीर्ती नगरातील नागरी समस्या सर्वांच्या सहकार्याने कशा दूर करता येतील हे सांगितले.

सभेचे अध्यक्ष माजी नगरसेवक नरेंद्र मेंढे यांनी संस्थेच्या प्रगतीवर समाधान व्यक्त करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

सभेला नासिक शामकुंवर, डॉ राजेंद्र शंभरकर, दादाराव कापसे, शालिकराम घुटके, सुनील पाटील, शकुंतला वानखेडे, मीनाक्षी वाघमारे, राजेश गायकवाड, नाजुकराव लांडगे,भिमराव गायकवाड, किष्णा मेंढे, वासेकर, रामटेकेजी,सनकाडेजी इं.सह धम्मकिर्ती नगरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.