आई मातोश्री ग्रामीण सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयाचे उद्घाटन थाटात संपन्न 

124

आई मातोश्री ग्रामीण सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयाचे उद्घाटन थाटात संपन्न

# पतसंस्था ही दुर्बल घटकांची आधार बनावी – दिनेश बन्सोड 

वाडी(प्र) : भिमसेनेचे नागपूर जिल्हाध्यक्ष,सामाजिक कार्यकर्ते रोशन सोमकुवर यांच्या वतीने निर्मित “आई मातोश्री ग्रामीण सहकारी पतसंस्थेच्या” कार्यालयाचे उद्घाटन शनिवारी थाटात संपन्न झाले. सर्वप्रथम प्रमुख अतिथींच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर,तथागत गौतम बुद्ध यांच्या फोटोला माल्यार्पण व अगरबत्ती,मेणबत्ती प्रज्वलित करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सर्वांनी त्रिशरण-पंचशील ग्रहण केले.तद्नंतर प्रमुख अतिथी माजी जि.प.सदस्य दिनेश बन्सोड यांचे हस्ते विधिवत फीत कापून कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी पतसंस्थेचे संचालक रोशन सोमकुवर यांनी प्रमुख अतिथी माजी जि.प.सदस्य दिनेश बन्सोड,माजी उपसभापती रुपेश झाडे, माजी नगरसेवक दिनेश कोचे,सामाजिक कार्यकर्ते गौतम तिरपुडे,भिमरावजी कांबळे,धर्मा वानखडे,सुरज ढोक,पत्रकार नरेशकुमार चव्हाण,विजय वानखेडे इत्यादींचे शॉल,पुष्पबुके देऊन स्वागत केले. आपल्या प्रस्तावनेत संचालक रोशन सोमकुवर यांनी पतसंस्थेच्या कार्याचा आढावा प्रस्तुत केला व मध्यमवर्गीयांच्या आर्थिक उन्नतीसाठी पतसंस्था काम करणार असल्याचे सांगितले.यावेळी प्रमुख अतिथी माजी जि.प.सदस्य दिनेश बन्सोड यांनी या पतसंस्थेच्या माध्यमातून समाजातील दुर्बल घटकांची आर्थिक बाजू सक्षम होण्यासाठी पतसंस्था आधार बनेल असे मनोगत व्यक्त केले व पतसंस्थेला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.माजी उपसभापती रुपेश झाडे यांनी पतसंस्था आंबेडकर नगर सारख्या मागासवर्गीय निवासी क्षेत्रात स्थापन करण्यासाठी रोशन सोमकुवरचे कौतुक केले व पतसंस्था ग्राहकांच्या विश्वासास खरी उतरेल अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी इतरही मान्यवरांनी समायोजित मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाला सुप्रसिद्ध गायक सारीपुत्र वानखेडे, सुरज वानखेडे,भोजराज नंदागवळी,जितेंद्र बागडे,देवा राऊत,उमेश बोरकर,प्रशात मेश्राम, सिद्धार्थ खोब्रागडे. मनोज नगराळे,दिलीप मसराम,अमित रगारी,आशीष फुलझले,तूफान कांबळे,राजूसबाई सोमकुवर,बेबीबाई वानखेडे, मोनाली सोमकुवर इत्यादी उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन सुधाकर सोनपिंपळे यांनी तर आभार नंदू सोमकुवर यांनी मानले.