विहार इमारतीतील अतिक्रमण तातडीने हटवा

542

बौद्ध विहाराच्या इमारतीवर लता मंगेशकर रुग्णालय व्यवस्थापणाच्या अतिक्रमनाने आक्रोश!

# निवासी नागरिकांचे “बेमुदत धरणे” आंदोलन सुरू 

# ५ वर्षो पासून अनधिकृत ताबा ठेऊन रुग्णालयाचे सुरू 

# संचालक अमोल देशमुख च्या अरेरावी भूमिकेने संताप

वाडी (प्र): दत्तवाडी येथील धम्मकीर्ती नगरातील महाप्रज्ञा बुद्ध विहार परिसरातील प्रियदर्शी गृहनिर्माण संस्थेच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय इमारतीवर मागील ५ वर्षांपासून लता मंगेशकर रुग्णालयाच्या व्यवस्थापकाने अनधिकृत कब्जा करून हॉस्पिटल सुरू ठेवले आहे,मागणी करूनही खाली करून देण्याऐवजी संचालक अरेरावी करीत असल्याने नागरिकात तीव्र असंतोष पसरला असून इमारत खाली करण्याच्या मागणीसाठी धम्मकीर्ती नगरच्या नागरिकांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.

आंदोलन कर्ते नागरिक व संस्थेच्या महितीनुसार ही इमारत संस्थेच्या मालकीची असून ग्रंथालयासाठी आरक्षित होती.तत्कालीन संस्थाध्यक्ष गौतम पाटील यांनी या इमारतीतील तळमजला लता मंगेशकर रुग्णालयाला करारनामा करून भाडेतत्त्वावर दिला होता. परंतु ५ वर्षे लोटल्यानंतरही भाडेकरू लता मंगेशकर रुग्णालय यांनी रिक्त करण्यस्येवजी चुकीच्या पध्दतीने दुसऱ्या एका त्यांच्याच संस्थेला पोट भाड्याने किरायाने दिल्या.पुन्हा करार संपल्याने ही इमारत वाचनालयासाठी रिक्त करून देण्यासाठी प्रयत्न चालविले व लता मंगेशकर संचालक अमोल देशमुख यांना विनंती व संपर्क केला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन ही इमारत आम्हीच बांधल्याचे आश्चर्यजनक उत्तर देऊन मागणी धुडकावून लावली.या मुळे येथील भंते महापंथ व नागरिकांनी पोलीस स्टेशन ला तक्रार नोंदवली पत्रव्यवहार केला असता रुग्णालयाच्या वकिलांनी ही इमारत संस्थेने केंव्हाचीच परत केल्याचे लिखित स्वरूपात सांगितले. तर मग अमोल देशमुख यांनी ही इमारत हर्ड मेडिकल या संस्थेला कोणत्या अधिकाराने देऊन तेथे हॉस्पिटल सुरु ठेवले ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. असे असूनही अमोल देशमुख हे इमारत रिकामी करत नसल्याने येथील महिला-पुरुषात एकच रोष निर्माण झाला आहे.मागील एक वर्षापासून विहाराच्या संचालक मंडळांनी अमोल देशमुख यांची अनेकदा भेट घेतली सूचना व निवेदन देऊनही त्यांनी आतापर्यंत नुसते टोलवाटोलवीचे उत्तर देत आहे

या इमारतीवर केलेले अतिक्रमण विरोधात धम्मकीर्ती नगर येथील नागरिकांनी भदंत महापंथ महाथेरो यांच्या नेतृत्वात शनिवारपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.धरणे आंदोलनाला भंते महापंथ,माजी नगरसेवक नरेंद्र मेंढे,माणिकराव खोब्रागडे यांनी मार्गदर्शन केले या आंदोलनात मोठ्या संख्येने महिला,पुरुष,युवक सामील झाले असून मागण्या पूर्ण होई पर्यंत आंदोलन सुरु राहणार असल्याचा निर्धार व्यक्त केला