जागतिक महिला दिनी महिला सरपंचावर अविश्वास प्रस्ताव, नागरिक संतप्त !

91

जागतिक महिला दिनी महिला सरपंचावर अविश्वास प्रस्ताव, नागरिक संतप्त !

# आरोप तथ्यहीन! दौलामेटी सरपंच-उपसरपंच

वाडी (प्र): दवलामेटी ग्रा.पं. च्या महिला सरपंच रीता उमरेडकर व उपसरपंच प्रशांत केवटे यांच्यावर ८ मार्च महिला दिनी नागपूर ग्रामीणचे तहसीलदार यांनी अविश्वास प्रस्तावाची नोटीस बजावल्याने परिसरातील नागरिकात तहसीलदारा विरोधात आक्रोश निर्माण झाला आहे.तसेच जागतिक महिला दिनीच एका महिला सरपंचावर अशा प्रकारचा अविश्वास प्रस्तावा वर कार्यवाही करणे व तहसील कार्यालय कुणाच्यास तरी दबावाखाली कार्यवाही करीत असल्याचा आरोप वाडी पत्रकार परिषदेत वंचीत बहुजन आघाडी चे जिल्हाध्यक्ष विलास वाटकर यांनी केला.मागील २ वर्षा आधी दवलामेटी ग्रा.पं. च्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या निर्वाचित उमेदवार रिता उमरेडकर यांची सरपंच पदी तर काँग्रेसचे प्रशांत केवटे यांची उपसरपंच पदी वर्णी लागली होती. कालांतराने येथे विरोधी पक्षाने सत्ताधारी पक्षाच्या ४ सदस्यांवर अतिक्रमणात घर बांधल्याचा ठपका ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कारवाई करून त्यांना अपात्र घोषित केले होते.तद्नंतर एका सत्ताधारी सदस्याला तीन अपत्य असल्याचे कारण पुढे ठेवून विरोधी पक्षाने दबाव तंत्राचा वापर करीत त्याला आपल्याकडे ओढून घेतले व नुकतीच नागपूर ग्रामीणचे तहसीलदार वानखेडे यांच्याकडे अविश्वास प्रस्तावा चा प्रस्ताव सादर करण्यात आला.त्या अनुषंगाने येणाऱ्या ८ तारखेला अर्थात जागतिक महिला दिनी महिला सरपंचावर अविश्वास प्रस्ताव सभा आयोजित करण्याबाबत तहसील कार्यालयातर्फे निश्चित करण्यात आले. ही बाब परिसरात माहिती होताच नागरिक तहसीलदार व विरोधी पक्षाच्या या कृतीवर चांगलेच संतप्त झाले आहेत. पत्रकार परिषदेला गोवारी संघटने चे अध्यक्ष भगवान भोंडे,जिल्हाध्यक्ष विलास वाटकर, उपाध्यक्ष अतुल शेंडे, सरपंच रीता उमरेडकर, सदस्य श्रीकांत रामटेक सह पदाधिकारी कार्यकर्ते यांनी चर्चेत सांगितले की जागतिक महिला दिनी चा अविश्वास प्रस्ताव सभा पुढे ढकलण्यात यावी.तसेच विरोधी सदस्यांनी जे आरोप करून अविश्वास प्रस्ताव आणला आहे तो पूर्वग्रह दूषित व दबावाखाली व खोटा असल्याचे मत या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.