नवयुवक हनुमान मंदिर पंचकमेटी द्वारा तान्हा पोळा उत्सव संपन्न

16

# नवयुवक हनुमान मंदिर पंचकमिटी

वाडी(प्र): गौतमनगर,वाडी टेकडी येथील हनुमान मंदिरात तान्हा पोळा उत्सव बालगोपालांचे उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी मंदिर कमिटी चे अध्यक्ष प्रकाश कोकाटे यांचे घरुन गुढी उभारुन ढोलताशांच्या गजरात परीसरातुन मंदिरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. मंदिरात परिसरातील लहान मुलांनी पारंपरिक वेशभूषा प्रदान करुन नंदीबैल सजवून,समाजाला योग्य संदेश देणारे फलक ज्यात मुलींवर होणारे अत्याचार थांबवा, बेटी बचाओ-बेटी पढावो, शेतकरी आत्महत्या थांबवा, झाडे लावा-झाडे जगवा, स्रियांना संरक्षण द्या इत्यादी फलक हातात घेऊन नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी सामाजिक कार्यकर्ते पुरुषोत्तम रागीट,राजु खोब्रागडे यांनी उत्कृष्ट नंदीबैल, समाज जाग्रुती फलक,वेशभूषा इत्यादी बाबी विचारात घेऊन १० नंदीबैलांची निवड केली व प्रत्येकांना प्रोत्साहन पर रोख राशी बक्षीस दिले तर इतर सहभागी बालकांना बिस्किटे, चाकलेट, खाऊ देऊन या बालगोपालांचा आनंद द्विगुणित करण्यात आला. यावेळी पुरुषोत्तम रागीट, प्रकाश कोकाटे, राजु खोब्रागडे यांनी बालगोपालांना तान्हा पोळ्याच्या शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाला प्रामुख्याने गजानन पवार,सुधाकर लक्षणे,अशोक गायकवाड, तुकाराम ढेंगे,सुधाकर येवले, गुंडेराव पिंगळे, निखिल कोकाटे,राकेश ठाकरे, पप्पु पवार, गंगाधर ठाकरे, जितु लाडेकर,महेश पिंगळे,रहांगडाले,वडेकार, राजु अतकरी,अरविंद हिंगे,महेंद्र मगर,भगत,सचिन नितनवरे,सुखदेव मेश्राम, बंडु ऊके,पलाश गायकवाड, विक्की जाधव, तसेच महिला मंडळ च्या सर्व पदाधिकारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन गजानन पवार यांनी तर आभार महेश पिंगळे यांनी मानले.