वाडीत आदर्श माणुसकीचे दर्शन

277

आदर्श माणुसकीचा सन्मान

वाडी(प्र) : विजय रानकुंडे रा.मुरली ता.काटोल.आर्थिक परिस्थिती बेताची,त्यातच भर पडली जीवघेण्या गंभीर आजाराची,अनेक डॉक्टर-दवाखाने सुरू झाले, अनेक तपासण्या-चाचण्या सुरू झाल्या, निदान लागले,त्यात विजय रानकुंडे यांना हृदयाच्या गंभीर आजाराने ग्रासले असल्याचे निष्पन्न झाले,त्यावर एकच उपाय म्हणून डॉक्टरांनी हृदयाची मोठी शस्त्रक्रिया सांगितली.

शस्त्रक्रियेचा खर्च अडीच ते तीन लाख रुपये जो अवाक्याच्या बाहेर,परिवार चिंताग्रस्त.. अशा वेळेला विजय रांनकुंडेनी वाडी निवासी माजी जि.प.सदस्य दिनेश बन्सोड यांच्याशी संपर्क साधला. दिनेश भाऊंनी वेळेचा विलंब न लावता शालिनीताई मेघे रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी रामटेककर सर यांचेशी संपर्क साधून परिस्थितीशी अवगत केले. रामटेककर सरांनी या केसमध्ये जातीने लक्ष देऊन त्यांना भरती करण्यापासून तर मोफत यशस्वी ऑपरेशन होई पर्यंत पूर्णता: मदत केली व अवाक्या बाहेरचा खर्च वाचवून खऱ्या माणुसकीचे दर्शन घडवून अजूनही माणुसकी जिवंत असल्याचे आदर्श उदाहरण समाजासमोर प्रस्तुत केले. असे कार्य समाजात घडत राहिले पाहिजे ही अपेक्षा.
आज विजय रानकुंडे फिट ॲन्ड फाईन आहेत. यानिमित्ताने दिनेश बन्सोड यांनी मुरली या गावी निसर्गरम्य वातावरणात शालिनीताई मेघे रुग्णालयाचे
जनसंपर्क अधिकारी रमेश रामटेककर, डॉ.महेंद्र बेलिया यांचा शाल पुष्पबुके देऊन सन्मान केला. या सत्कारामुळे अधिक जोमाने कार्य करण्याची प्रेरणा मिळाल्याचे यावेळी रामटेककर सरांनी सांगितले.
यावेळी सन्मान करताना माजी जि.प.सदस्य दिनेशभाऊ बन्सोड, सिने अभिनेता,निर्माता पराग भावसार, शिव इव्हेंट्स चे संचालक शिवराज सिंग राजकुमार, भीमसेनेचे जिल्हाध्यक्ष रोशन सोमकुवर, प्रसिद्ध गायक सारीपुत्र वानखडे, पो.काॅ.विनोद कांबळे, बन्सोड, वाडी पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन तलमले, सचिव विजय वानखेडे, वरिष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिलभाऊ पुंड, भीमरावजी कांबळे, संजूभाऊ मोटघरे, दिलीप भोरगडे, नितीन वाघमोडे, प्रवीण तायडे सह अनेकांनी यावेळी विजय रानकुंडे यांच्या मंगल आयुष्याची कामना केली.
🙏🙏🙏
तदनंतर गीत-गायनाच्या संगितमय वातावरणात स्वादिष्ट भोजनाचा आनंद घेण्यात आला.